Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price : सोन्या-चांदीचे मीटर डाऊन; सोने खरेदीआधी चेक करा नवीन भाव..

Gold Price : तीन महिन्यांत सर्वाधिक पातळी गाठल्यानंतर सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 52,811 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. दुसरीकडे, जर फ्युचर्स किंमतीबद्दल सांगितले तर गुरुवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली. गुरुवारी सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये 5 ऑक्टोबर 2022 च्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव घसरत होता. तो 0.37 टक्के किंवा 191 रुपयांनी घसरून 52,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होता. जागतिक बाजारातील घसरणीच्या ट्रेंडमुळे सोन्याच्या दरात ही घसरण दिसून आली. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली.

Advertisement

Loading...
Advertisement

गुरुवारी सकाळी 5 सप्टेंबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी (Silver) मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये 0.73 टक्क्यांनी किंवा 432 रुपयांनी घसरून 58,528 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. त्याचवेळी बुधवारी दिल्ली सराफा बाजारात चांदी 575 रुपयांच्या घसरणीसह 58,985 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

Advertisement

तसे पाहिले तर आपल्या देशात सोन्याला कायमच मागणी असते. सण उत्सवाच्या काळात तर ही मागणीच आणखीच वाढते. त्यासाठी नेहमीच दुसऱ्या देशांकडून सोने आयात (Gold Import) करावी लागते. त्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडींचा देशांतर्गत सोने चांदीच्या दरावर परिणाम होतो. जागतिक बाजार सोने आणि चांदीचे दर कमी किंवा जास्त झाले तर त्यानुसार देशांतर्गत बाजारपेठेतील दर निश्चित होतात. मध्यंतरी कोरोना (Corona) काळात सर्वकाही ठप्प होते. त्यावेळी सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोन्याने तर 56 हजारांचाही टप्पा पार केला होता. कारण, या काळात लोकांनी सुरक्षित गुंतवणूक (Investment) म्हणून सोने खरेदी केली होती. त्यामुळे या काळात सोन्याची मागणी वाढली होती. त्याचा परिणाम दरवाढीत दिसून आला. आता मात्र तशी परिस्थिती नाही. तरी देखील सोन्याचे भाव फारसे कमी झालेले नाहीत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply