Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

RBI : ‘या’ बँकेचा परवाना रद्द, तुमचेही खाते आहे का ? तर पैसे निघणार नाही

Please wait..

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Rupee Co-operative Bank) परवाना रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 12 सप्टेंबर 2017 च्या आदेशाचे पालन करून आरबीआयने ही कारवाई केली आहे. हा आदेश आजपासून सहा आठवड्यांनंतर म्हणजेच 22 सप्टेंबर 2022 पासून लागू होईल. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक पुणेला बँकिंग व्यवसाय वाढवण्याची परवानगी दिली असती तर सार्वजनिक हिताचे नुकसान होऊ शकते, असे आरबीआयने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement

आर्थिक परिस्थिती खराब असल्याने निर्णय
खराब आर्थिक स्थितीमुळे ही बँक आपल्या ठेवीदारांना रक्कम परत करू शकत नाही. बँकेत जमा केलेल्या रकमेपैकी ग्राहकांना जास्तीत जास्त 5 लाख रुपयेच परत मिळतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

Advertisement
Loading...

RBI ने निर्बंध लादले
आजपासून सहा आठवड्यांनंतर बँक बँकिंग व्यवसाय करणे बंद करेल, असे आरबीआयने म्हटले आहे. बँकेला ‘बँकिंग’चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात येईल, असे आरबीआयने म्हटले आहे. या निर्बंधाच्या अंमलबजावणीनंतर, पैसे बँकेत जमा किंवा काढता येणार नाहीत.

Advertisement

Advertisement

या कलमांवर कारवाई केली
बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. हे बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 11(1) आणि कलम 22(3)(d) तसेच कलम 56 च्या तरतुदींचे पालन करत नाही. कलम 22(3)(a), 22(3)(b), 22(3)(c), 22(3)(d) आणि 22(3)(e) च्या आवश्यकतांचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply