Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Ahmednagar Muharram: हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन ; शहरात मोहरम उत्साहात ..

Please wait..

Ahmednagar Muharram : संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर (Ahmednagar) शहरातील मोहरम (Muharram) यावेळी देखील मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. मागच्या दोन वर्ष राज्यात लागू असलेल्या कोरोना (Corona) निर्बंधामुळे मोहरम साजरे करता आले नव्हते. मात्र आता राज्य सरकारने (state government) कोरोना निर्बंध हटवल्याने पुन्हा एकदा भाविकांनी मोठ्या उत्साहात मोहरम साजरे केले. सोमवार दी. 8 ऑगस्ट रात्री कत्तलची रात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Advertisement

Advertisement
Loading...

कत्तल ची रात निमित्त कोठला येथील छोटे बारा इमाम आणि हवेली येथील बडे बारा इमाम यांच्या सावरांची मिरवणूक शहरातील विविध भागातून काढण्यात आली होती. यावेळी भाविकांमधून या हुसैन या हुसैन ची घोषणा देण्यात आली.

Advertisement

Advertisement

तसेच कत्तलची रात मिरवणुकीत कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस देखील सज्ज होती. शहरातील विविध भागात यावेळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply