Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Cabinet Expansion : आज होणार मंत्रिमंडळाचा विस्तार.. ‘या’ उमेदवारांना मिळणार मंत्रीपद; जाणून घ्या..

Cabinet Expansion : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथ घेतल्यानंतर 40 दिवसांनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) करणार आहेत. राज्यात तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. आज म्हणजेच मंगळवारी राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे (BJP) 10 ते 11 आणि मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील 6 ते 7 जण शपथ घेऊ शकतात. भाजपने मंत्रीपदासाठी कुणाला संधी दिली त्यांची नावे आता समोर आली आहेत.

Advertisement

Advertisement

कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) – काँग्रेस सरकार पडल्यानंतर 26 जुलै 2019 रोजी सत्तेत परतल्यावर तीन आठवडे एकट्याने सरकार चालवले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबावर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने 40 दिवस सात सदस्यीय मंत्रिमंडळाबरोबर काम केले.

Loading...
Advertisement

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर 30 जून रोजी शिंदे आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारने 4 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेत बहुमत सिद्ध केले. द्विसदस्यीय मंत्रिमंडळाच्या अनेक बैठका झाल्या असून राज्यातील रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासह महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिवसेना आणि शिंदे गट वाद हा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. पण, आता मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे.

Advertisement

भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत यांना आतापर्यंत फोन केला असल्याची माहिती आहे. म्हणजेच हे आमदार आज मंत्रीपदासाठी शपथ घेऊ शकतात. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना निरोप देण्यात आला आहे. उर्वरीत आमदारांना कोर्टाच्या निकालानंतर शपथ दिली जाणार असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply