Share Market: ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला 32000% नफा मात्र तज्ञ म्हणातात दूरच रहा; जाणुन घ्या नेमकं कारण
Share Market: अनेक लोक शेअर बाजारात (Share market) गुंतवणूक (Invest) करतात. पण शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराची चांगली माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. बहुतेक लोक केवळ नामांकित कंपन्यांच्या शेअर्सवर पैसे गुंतवतात. पण मोठ्या कंपन्या नफा कमावतात असे अजिबात नाही. कधीकधी अशा काही कंपन्या मजबूत परतावा देखील देतात, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीबद्दल सांगणार आहोत, जिच्या IPO ने अवघ्या 15 दिवसात 32000% रिटर्न दिला आहे.
15 दिवसात 32600 टक्के परतावा
आम्ही हाँगकाँग स्थित फिनटेक कंपनी AMTD Digital बद्दल बोलत आहोत. एएमटीडी डिजिटलच्या आयपीओने यूएस मार्केटमध्ये 15 दिवसांत 32600 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. तथापि, पुढील 2 दिवसांत, स्टॉकने त्याच्या विक्रमी उच्चांकावरून सुमारे 96 टक्के ब्रेक केला आहे.
Indian Railway : रेल्वेची मोठी घोषणा; ‘त्या’ नियमात होणार मोठा बदल, जाणुन घ्या डिटेल्स https://t.co/BRX5M7ZkF6
Advertisement— Krushirang (@krushirang) August 6, 2022
Advertisement
कंपनीचे शेअर्स 96 टक्क्यांनी घसरले
AMTD Digital चा स्टॉक 15 जुलै रोजी बाजारात लिस्ट झाला होता. त्याच्या IPO ची मूळ किंमत प्रति शेअर $7.80 होती. पण 2 ऑगस्टपर्यंत हा स्टॉक $2555.30 वर पोहोचला. त्यानुसार कंपनीच्या शेअरने अवघ्या 15 दिवसांत 32660 टक्के परतावा दिला. मात्र, यानंतर स्टॉकमध्ये घसरण सुरू झाली. 2 ऑगस्टनंतर त्याच्या स्टॉकमध्ये घट दिसून आली. आतापर्यंत, हा स्टॉक त्याच्या उच्चांकावरून सुमारे 96 टक्के घसरला आहे आणि $1100 वर आला आहे. 3 ऑगस्ट रोजी त्यात 30 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
Electric Vehicle : शेतकऱ्यांनो देशात लाँच होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; ‘या’ कंपनीची घोषणा, जाणुन घ्या किंमत https://t.co/cBiDjpIrrl
Advertisement— Krushirang (@krushirang) August 6, 2022
Advertisement
असा सल्ला तज्ज्ञांनी दिला
कंपनीने त्याच्या IPO मधून $12.5 दशलक्ष जमा केले. या शेअरने मोठी झेप कशी घेतली हे कोणालाच माहीत नाही. पण ही कंपनी 14वी सर्वात मोठी कंपनी बनली होती. या प्रकरणात Walmart, Alibaba, Toyota Motors, Coca-Cola, Bank of America आणि Disney सारख्या कंपन्यांना मागे टाकले. त्याचबरोबर गुंतवणूकदारांनी या शेअरपासून दूर राहावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.