Electric Vehicle : शेतकऱ्यांनो देशात लाँच होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; ‘या’ कंपनीची घोषणा, जाणुन घ्या किंमत
Electric Vehicle : पेट्रोल आणि डिझेलचा (Petrol and diesel) सततचा तुटवडा पाहता, आता सर्व वाहन कंपन्या इलेक्ट्रिक (Electric) मोडवर स्विच करण्यात व्यस्त आहेत. ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) कंपनीने पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात 10 हजाराहून अधिक इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, लॉन्च करण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा समावेश असेल. ही वाहने चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स बनवण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये चाचण्या सुरू आहेत
OSM कंपनीचे चेअरमन उदय नारंग यांनी भारतात प्रथमच लाँच होणार्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरबद्दल सविस्तरपणे सांगितले. ते म्हणाले, “कंपनीने दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये आपली संशोधन-विकास केंद्रे स्थापन केली आहेत. त्या केंद्रांवर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होताच, आम्ही हे ट्रॅक्टर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारतात लाँच करू. 2022-23 च्या अखेरीस श्रेणी II आणि III शहरांमध्ये या वाहनांची सर्व्हिसिंग आणि भाडेतत्त्वावर देण्याची नवीन संकल्पना देखील आम्ही आणू.
Top 5 SUV: ‘ह्या’ आहे देशात जुलैमध्ये विकल्या गेलेल्या टॉप 5 SUV https://t.co/CmQFlZiSOm
Advertisement— Krushirang (@krushirang) August 5, 2022
Advertisement
कंपनीचे कार्यालय फरीदाबाद येथे आहे
फरीदाबादस्थित कंपनी OSM इलेक्ट्रिक तीन वाहने बनवते. याशिवाय छोटी व्यावसायिक वाहनेही कंपनी बनवतात. बाजारातील मागणी पाहता त्यांची कंपनी लवकरच ड्रोन, ट्रॅक्टर आणि दुचाकी बाजारात आणणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. OSM कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर लॉन्च करून भारताच्या ऑटो क्षेत्रात प्रवेश केला. दिल्लीत या ऑटोची किंमत 3.40 लाख रुपये आहे.