Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Vice President Election : उपराष्ट्रपती पदासाठी शनिवारी निवडणूक, पहा, काय आहेत राजकीय गणिते..

Vice President Election : उपराष्ट्रपती पदासाठी उद्या म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून त्याच दिवशी निवडणुकीचा (Election) निकाल लागणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपणार आहे. यावेळी एनडीएने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांना उमेदवारी दिली आहे, तर विरोधकांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक एनडीएने जिंकल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय घडणार, कोण उपराष्ट्रपती होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

सध्या भाजपकडे (BJP) लोकसभेच्या खासदारांची संख्या 303 आहे. राज्यसभेत 93 खासदार आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील एकूण मतांवर नजर टाकल्यास भाजपकडे 395 इतकी संख्या आहे, तर विजयासाठी केवळ 394 सदस्यांची गरज आहे. निवडणुकीत मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सर्व उमेदवारांना किती प्रथम प्राधान्याची मते मिळाली हे पाहिले जाते. जर पहिल्या फेरीत उमेदवाराला आवश्यक कोट्यापेक्षा समान किंवा जास्त मते मिळाली तर तो विजयी घोषित केला जातो. हे शक्य नसेल, तर ज्या उमेदवाराला कमी मते मिळाली आहेत त्याला बाद केले जाते. त्यानंतर दुसरा प्राधान्यक्रम कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली आहेत हे तपासले जाते. त्यानंतर त्याच्या पसंतीची ही मते दुसऱ्या उमेदवाराकडे हस्तांतरित केली जातात.

Advertisement

आपल्या देशात उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे (Rajyasabha) अध्यक्ष देखील असतात. कोणत्याही कारणामुळे राष्ट्रपतीचे पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती त्याची जबाबदारी घेतात. पदाच्या बाबतीत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींपेक्षा (President) लहान आणि पंतप्रधानांपेक्षा (Prime Minister) मोठे असतात. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत फक्त लोकसभा आणि राज्यसभा खासदारच मतदान करतात. या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यही सहभागी होतात. म्हणजे निवडणुकीत एकूण 788 मते पडू शकतात. यामध्ये लोकसभेचे 543 खासदार आणि राज्यसभेचे 243 सदस्य मतदान करतात. राज्यसभा सदस्यांमध्ये 12 नामनिर्देशित खासदार आहेत.

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply