America : अमेरिकेचे वाढले टेन्शन..!; ‘या’ घातक आजाराला रोखण्यासाठी जाहीर केली Health Emergency
America : अमेरिकेत मंकीपॉक्स (Monkeyox) या घातक आजाराची सुमारे 7000 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यानंतर देशभरात आरोग्य आणीबाणी (Health Emergency) घोषित करण्यात आली आहे. खुद्द राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांनी ही घोषणा केली. अमेरिकेने मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, की ‘मी मंकीपॉक्सला अटकाव करण्यासाठी, लस वितरणास गती देण्यासाठी वचनबद्ध आहे. चाचणीचा विस्तार करणे आणि जोखीम असलेल्या लोकांना शिक्षित करणे जास्त महत्वाचे आहे. म्हणूनच या प्रादुर्भावाचा तात्काळ सामना करण्यासाठी विषाणूवर आजची सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची घोषणा महत्त्वपूर्ण आहे.’
अमेरिकेत (America) मंकीपॉक्सच्या लसी (Vaccine) आहेत. परंतु ते सर्वत्र समान प्रमाणात आढळत नाहीत. अशा परिस्थितीत बायडेन सरकार आधीच सर्वसामान्यांच्या निशाण्यावर आहे. याबरोबरच मंकीपॉक्सचे रुग्णही वेगाने वाढत आहेत. मात्र सरकारची सर्व पावले कमी पडत आहेत. यामुळेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मंकीपॉक्सला राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे आणि सांगितले आहे, की या घोषणेनंतर मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी फेडरल सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येईल.
संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) आधीच मंकीपॉक्सला महामारी म्हणून घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्राने सर्व देशांना मंकीपॉक्सचा संभाव्य प्रसार रोखण्याचे आणि कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले. भारतातही (India) या आजाराची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. भारतात केरळमधील (Kerala) एका व्यक्तीचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे. तथापि, देशात आलेली पहिली 9 प्रकरणे दिल्ली आणि केरळ राज्यातील आहेत.