Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

PNG Price : महागाईच्या दिवसात आम आदमीला आणखी एक झटका; ‘या’ इंधनाच्या दरात मोठी वाढ..

PNG Price : मोठ्या शहरांतील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा (Inflation) आणखी एक झटका बसला आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) पीएनजीचे दर दिल्लीत वाढले आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने PNG ची किंमत प्रति युनिट 2.63 रुपयांनी वाढविली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना हा धक्काच बसला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

Advertisement

Advertisement

आता दिल्लीतील नवीन किंमत 50.59 रुपये प्रति SCM झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये प्रति SCM 50.46 रुपये आणि गुरुग्राममध्ये 48.79 रुपये प्रति SCM. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील गॅस वितरक महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने CNG आणि PNG दोन्हीच्या किमती वाढविल्या होत्या. महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत (Mumbai) पीएनजीच्या (Piped Natural Gas) दरात चार रुपयांनी वाढ केली होती.

Loading...
Advertisement

ट्विटमध्ये, IGL ने दिल्ली तसेच शहरांमध्ये PNG च्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. IGL ने ट्विट केले की, इनपुट गॅसच्या किमतीतील वाढ अंशतः भरून काढण्यासाठी, कानपूर, फतेहपूर आणि हमीरपूरमधील घरगुती PNG किंमत 5 ऑगस्ट 2022 पासून प्रति SCM 53.10 रुपयांपर्यंत सुधारली जात आहे. अजमेर, पाली आणि राजसमंदमधील घरगुती PNG ची किंमत 5 ऑगस्ट 2022 पासून प्रति SCM 56.23 रुपयांपर्यंत सुधारली जात आहे. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी दरवाढ आहे. 26 जुलै रोजी दर शेवटचे 2.1 रुपये प्रति SCM ने वाढ करण्यात आले होते.

Advertisement

देशात सध्या महागाई सातत्याने वाढत चालली आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे महागाई वाढत चालली आहे.  याचा त्रास मात्र देशातील गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply