Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Tiranga: म्हणून ‘हर घर तिरंगा’ला शेतकरी संघटनेचा विरोध; पहा नेमके काय वास्तव मांडले त्यांनी

Tiranga: पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (Amrit Jubilee year of Independence) महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने हर घर तिरंगा अभियान (Har Ghar Tricolor Tiranga Abhiyan) राबविण्याची जय्यत तयारी केली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi’s government) यांच्या सरकारने यासाठी सोशल मिडियामध्ये प्रचार सुरू केला आहे. मात्र, स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्ष झाली तरी शेतकरी मात्र पारतंत्र्यातच असल्याचा अनुभव असल्यामुळे शेतकरी या उत्सवात सहभागी होणार नाहीत असे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (National President of Independent India Party Anil Ghanwat) यांनी म्हटले आहे. तसेच शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या शिलेदारांनी यास विरोध असल्याचे पत्र पाठवण्यास सुरूवात केली आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

(Sharad Joshi’s Shiledars of the farmers’ organization have started sending letters opposing it) आपल्या भावना शेतकऱ्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (Chief Minister and Deputy Chief Minister through letters) यांना कळवाव्यात असे आवाहन करताना घनवट यांनी म्हटले आहे की, अनेकांच्या बलिदानानंतर मिळालेल्या भारताच्या स्वातंत्र्याबद्दल शेतकऱ्यांना अभिमान आहे व सालाबादप्रमाणे १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन शेतकरी साजरा करतील. पण ७५ वर्ष होऊनही कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांपर्यंत खरे स्वातंत्र्य पोहोचलेच नाही, याची खंत आहे. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही शेतकऱ्याचे मरण हे सरकारचे धोरण राहिले आहे हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी व सरकारच्या अशा धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. (Conspiracy to depress prices of agricultural commodities is going on continuously, export ban, limit on stocks, unnecessary imports)

Advertisement

महाराष्ट्र शासनाने, ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत भारतातील शेतकऱ्यांचे फक्त शोषणच झाले व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. शेतीमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडण्याचे कारस्थान सतत सुरू आहे. त्यासाठी निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, अनावश्यक आयातीसारखी हत्यारे वापरली जात आहेत. शेतकऱ्यांचे भूमी हक्क संकुचित केले आहेत, अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास सुद्धा बंदी आहे, हे कसले स्वातंत्र्य? लाखो शेतकरी आत्महत्या आहेत. देशातील गरिबी आहे, बेरोजगारी आहे. देश आर्थिक संकटात लोटला जात आहे. अशा परिस्थितीत न मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात भारतातील शेतकऱ्यांना रस नाही असेही स्वतंत्र भारत पक्षाने म्हटले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply