Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pakistan: पाक आर्मीला मोठा झटका..! पहा काय झालेय बलुचिस्तान प्रांतात

Please wait..

Pakistan: इस्लामाबाद : सोमवारी बेपत्ता झालेले पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर (ISLAMABAD: The helicopter of the Pakistan Army) बलुचिस्तानमध्ये कोसळले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स यांनी (ISPR / Pakistan’s Inter Services Public Relations) मंगळवारी याबाबत सांगितले की, हेलिकॉप्टरमधील सहा लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगनुसार, हेलिकॉप्टरमध्ये 12 कॉर्प्स कमांडर जनरल सरफराज अली (Corps Commanders General Sarfaraz Ali) आणि इतर पाच वरिष्ठ लष्करी अधिकारी होते. जे बलुचिस्तानमध्ये (Balochistan) सुरू असलेल्या पूर मदत कार्यावर लक्ष ठेवून होते.

Advertisement
Loading...

Advertisement

मात्र, त्याचवेळी लष्कराच्या या दाव्यावर काही स्थानिक बातम्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या विमान अपघातात ठार झालेले कमांडर जनरल सरफराज अली हे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या (Pakistan’s intelligence agency ISI) खूप जवळचे होते. बलुचिस्तानच्या न्यूज वेबसाइट द बलुचिस्तान पोस्टने म्हटले आहे की, ‘पाकिस्तानी लष्कराचा दावा आहे की, खराब हवामानामुळे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले. तर ग्राउंडवरील आमच्या स्रोतांकडील डेटा आणि हवामान विभाग (Meteorological Department) पुष्टी करतो की या भागात हवामान पूर्णपणे सामान्य होते. वाऱ्याचा वेग 16 ते 24 किमी प्रतितास होता आणि पाऊस 10 टक्क्यांपेक्षा कमी होता. अफगाणिस्तानातील (Afghanistan) अल-कायदाचा (al-Qaeda leader al-Qaeda in Afghanistan) म्होरक्या एका दिवसापूर्वीच अमेरिकेच्या (America) ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याने वेबसाइटच्या या दाव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानी लष्कराच्या सहकार्याने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे आणि पाकिस्तानला जवाहिरीच्या सर्व हालचालींची माहिती होती. वृत्तानुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा (Pakistan Army Chief General Bajwa) अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply