IND vs WI : वेस्ट इंडिज संघाला धक्का..! भारतीय संघाने केली ‘ही’ जबरदस्त कामगिरी; जाणून घ्या..
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकाही जिंकली आहे. दुसरा सामना त्रिनिदाद (Trinidad) येथील क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) कर्णधार निकोलस पूरनने (Nicholas Pooran) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाई होपने (Shai Hope) केलेल्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने 50 षटकांत 6 विकेट गमावून 311 धावा केल्या.
भारताला 312 धावांचे लक्ष्य मिळाले, जे संघाने शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. भारताकडून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) यांनी अर्धशतके केली. अक्षर पटेलनेही एक विकेट घेतल्याने त्याला सामनावीराचा किताब मिळाला. भारताने हा सामना 2 विकेटने जिंकून मालिकाही जिंकली आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात लवकर आऊट झालेल्या होपने सलामीवीराची भूमिका चांगली पार पाडली. त्याने काइल मेयर्सबरोबर पहिल्या विकेटसाठी 65 धावा आणि त्यानंतर शमराह ब्रुक्सबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. मेयर्स आणि ब्रूक्स बाद झाल्यानंतर, होपला कर्णधार पूरनने चांगली साथ दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 126 चेंडूत 117 धावांची भागीदारी केली. पूरनने 74 धावा केल्या.
अक्षर पटेल (1/40) आणि दीपक हुडा (1/42) यांनी चांगली गोलंदाजी केली तर चहलने (1/69) एक विकेट घेतली पण या गोलंदाजांनी रन जास्त दिले. होप आपल्या 100व्या एकदिवसीय सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजला होप आणि मेयर्स यांनी चांगली सुरुवात करून दिली. मेयर्सने आक्रमक फलंदाजी केली. वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानाचा भारतीय संघाने यशस्वी पाठलाग केला. सामन्याबरोबरच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही संघाने जिंकली आहे. आता पुढील तिसरा सामना औपचारिकेचाच राहिला आहे.