Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

World Food Crisis : जगाते ‘ते’ मोठे संकट टळणार ? ; रशिया-युक्रेनने केला ‘हा’ मोठा करार; जाणून घ्या..

Please wait..

World Food Crisis : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia Ukraine War) अनेक महिने उलटून गेले तरी हे महायुद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दोन्ही देशांमध्‍ये सुरू असलेली आडमुठेपणा आणि आपले वर्चस्वाची लढाई यामुळे जगभरातील अनेक देश अन्न संकटातून जात आहेत. शुक्रवारी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र (United Nations) आणि तुर्कस्तान यांच्याबरोबर करार केल्याने या महायुद्धाच्या काळात मोठा दिलासा मिळाला. संघर्षाच्या काळात या करारामुळे जागतिक बाजारपेठेत धान्य निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

Advertisement

काळ्या समुद्रातून (Black Sea) युक्रेनची धान्य निर्यात पुन्हा सुरू करण्याचा करार काही आठवड्यांत पूर्णत: कार्यान्वित होईल आणि युद्धपूर्व पातळीवर परिस्थिती येईल, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्रांनी शुक्रवारी व्यक्त केली. दोन्ही देशांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला आहे. 23 जुलै रोजी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन पाच महिने पूर्ण होतील.

Advertisement

Advertisement
Loading...

तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या या कराराकडे (Deal) युद्धामुळे निर्माण झालेले आंतरराष्ट्रीय अन्न संकट कमी करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून पाहिले जात आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) म्हणाले, की “आज काळ्या समुद्रावर आशेची किरण उभी राहिली आहे. ही अशी परिस्थिती आहे ज्याची संपूर्ण जगाला नितांत गरज आहे. रशिया आणि युक्रेन हे जगातील सर्वात मोठे अन्न निर्यातदार आहेत. युक्रेनवरील आक्रमणामुळे युक्रेनियन बंदरांची नाकेबंदी झाली, डझनभर जहाजे अडकली आणि 20 दशलक्ष टन धान्य अडकले आणि जगभरातील धान्याच्या किमती वाढल्या. आता मात्र धान्याची किंमती कमी होतील तसेच पुरवठाही सुरळीत होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. अमेरिका आणि नाटोकडून युक्रेनला आर्थिक, लष्करी मदत मिळत आहे. त्यामुळे हे युद्ध आधिकच चिघळले आहे. या युद्धामुळे केवळ रशिया आणि युक्रेनच नाही तर अवघ्या जगाला फटका बसला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply