Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recharge Plan : तीन महिने रिचार्जचे टेन्शनच नाही; ‘हे’ आहेत तीन कंपन्यांचे खास प्लान..

Please wait..

Recharge Plan : सध्या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लानच्या दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक जण फायदेशीर आणि कमी किंमतीतील रिचार्ज प्लानच्या शोधात आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) सर्वात स्वस्त 4G प्लान्सचा दावा करत असताना, एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडीया (Vodafone Idea) कंपनीचे प्लान किंमतीत जवळपास सारखेच आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला Jio, Airtel आणि Vodafone Idea या कंपन्यांच्या अतिशय स्वस्त प्‍लानबद्दल माहिती देणार आहोत. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता (Validity) मिळते. Jio चा प्लान इतका स्वस्त आहे की एका महिन्याची किंमत फक्त 141 रुपये आहे. तर Airtel आणि Vi मध्ये ते दरमहा सुमारे 163 रुपये आहे.

Advertisement

Advertisement

जिओचा 395 रुपयांचा प्लॅन
तिन्ही कंपन्यांमध्ये हा सर्वात स्वस्त 84 दिवसांचा प्लान आहे. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि 1000 एसएमएससह एकूण 6 GB डेटा मिळतो. हा डेटा वैधतेमध्ये कधीही वापरला जाऊ शकतो. तुम्हाला Jio App चे मोफत सबस्क्रिप्शन (Free Subscription) देखील देण्यात आले आहे. या प्लानमध्ये तुम्ही 141 रुपयांमध्ये 30 दिवस मिळतात.

Advertisement

Advertisement
Loading...

एअरटेलचा 455 रुपयांचा प्लान
एअरटेलच्या 455 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांसाठी 6 GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉल सुविधा आहे. यामध्ये एका महिन्याचा खर्च 162 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 900 SMS सह मोफत HelloTunes आणि विंक म्युझिक मोफत सबस्क्रिप्शन यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळतील.

Advertisement

व्होडाफोन आयडिया 459 रुपयांचा प्लान
Vodafone Idea चा प्लान देखील फीचर्स मध्ये इतर दोन कंपन्यांसारखाच आहे. एका महिन्यासाठी त्याची किंमत 163 रुपये आहे. प्लानमध्ये 84 दिवसांसाठी 6 GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 1000 SMS मिळतात. यासह, Vi Movies & TV Basic सबस्क्रिप्शनही मिळते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply