Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia Ukraine War : युद्धाबाबत अमेरिकेने केला मोठा दावा; म्हणाला, रशिया-युक्रेनचे सैनिक..

Please wait..

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला जवळपास 5 महिने झाले आहेत. या युद्धात दोन्ही देशांचे खूप नुकसान झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या (America) गुप्तचर संस्थेने युद्धात मारल्या गेलेल्या रशियन सैनिकांची संख्या दिली आहे. अमेरिकेच्या दाव्यानुसार, युद्धात आतापर्यंत सुमारे 15,000 रशियन सैनिक मारले गेले आहेत. याबरोबरच सुमारे 45 हजार रशियन सैनिकही या युद्धात जखमी झाले आहेत. केंद्रीय गुप्तचर संस्थेचे (CIA) संचालक विल्यम्स बर्न्स यांनी बुधवारी हा दावा केला आहे.

Advertisement

Advertisement

सीआयएच्या संचालकाने अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये दावा केला आहे की, युक्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात लोक मारले गेले आहेत. युक्रेनमध्ये मारल्या गेलेल्या लोकांची संख्या रशियन लोकांच्या संख्येपेक्षा थोडी कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) हमला केला होता. युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियन सैन्याने हल्ले केले. या दरम्यान युक्रेनमधूनही मोठ्या संख्येने लोक स्थलांतरित झाले आहेत.

Advertisement

Advertisement
Loading...

युक्रेनियन सैन्याने रशियन-व्याप्त दक्षिण युक्रेनमधील पुरवठा मार्गासाठी महत्त्वाच्या पूलावर हमला केला आणि त्याचे नुकसान केले. त्याचवेळी, युक्रेनच्या ईशान्येकडील भागात रशियाने केलेल्या गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियन-व्याप्त दक्षिणी युक्रेनच्या खेरसन प्रदेशातील मॉस्को-समर्थित प्रशासनाचे प्रमुख किरील स्ट्रेमोसोव्ह यांनी सांगितले की युक्रेनियन सैन्याने नदीवरील पुलावर क्षेपणास्त्रे डागली, त्यापैकी 11 पूलावर आदळली.

Advertisement

जवळपास 1.4 किमी पुलाचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु तो वाहतुकीसाठी बंद केलेला नाही. स्ट्रेमोसोव्ह म्हणाले, की युक्रेनच्या सैन्याने हा हमला अमेरिकेने प्रदान केलेल्या मल्टी-रॉकेट लाँचर्सने केला, जे रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने अक्षम केले होते. हा पूल वाहनांसाठी बंद करण्यात आलेला नसून, परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply