Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Politics : आम आदमीने गुजरातला देणार ‘हे’ मोठे गिफ्ट; पहा, काय म्हणालेत अरविंद केजरीवाल..?

Please wait..

Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाचे (AAP) निमंत्रक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुजरातमध्ये (Gujarat) मोफत वीज देण्याची (Free Electricity) तयारी केली आहे. गुजरातमध्ये पहिली हमी म्हणून, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी राज्यात त्यांच्या पक्षाने सरकार स्थापन केल्यास प्रत्येक कुटुंबाला दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व जुनी बिले माफ करण्यात येणार आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यांत या आश्वासनाची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Loading...

मोफत वीज ही जादू असल्याचे सांगताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही जादू फक्त त्यांनाच येते. असे आश्वासन कोणी देत ​​असेल तर लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असेही ते म्हणाले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जर त्यांच्या पक्षाचे सरकार बनले तर दिल्ली (Delhi) आणि पंजाबप्रमाणे (Punjab) गुजरातमध्येही त्यांचे सरकार मोफत वीज देईल आणि 24 तास वीज दिली जाईल. केजरीवाल म्हणाले, की 31 डिसेंबर 2021 पर्यंतची सर्व जुनी प्रलंबित बिले माफ केली जातील. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) भाजपने 125 युनिट वीज मोफत केली, पाणी मोफत केले, बसचे निम्मे भाडे आकारणार असल्याचेही ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये अमित शहा (Amit Shah) यांनी 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. तर मग गुजरातशी काय शत्रुत्व आहे, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

Advertisement

Advertisement

सध्या गुजरातमध्ये भाजप सरकार आहे. पुढील वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधी पार पडलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आम आदमी पार्टीने येथे चांगली कामगिरी केली आहे. राज्यात आता हळूहळू का होईना पण, पक्षाचे अस्तित्व दिसायला लागले आहे. त्यामुळे भविष्यात भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. तसेच काँग्रेसच्याही (Congress) अडचणी वाढणार आहेत. आपने गुजरातप्रमाणेच अन्य राज्यांतही चमकदार कामगिरी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मध्य प्रदेश राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीतही पक्षाने चांगली कामगिरी केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply