Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Biogas subsidy scheme: गोबरगॅस अनुदानासाठी ‘तिथे’ करा संपर्क; व्हा आत्मनिर्भर

Please wait..

Biogas subsidy scheme: कोल्हापूर : सध्या एकूण इंधन दरवाढीमध्ये स्वयंपाकसाठी वापरत असलेल्या एलपीजी गॅसच्याही (prices of LPG gas) किमती गगनाला भिडल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या (central and state governments) दणक्यात करवसुलीमुळे हा गॅस महागला आहे. मात्र, त्याचवेळी केंद्र सरकारतर्फे मागील अनेक दशकांपासून राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम (National Biogas and Fertilizer Management Program) याचा आपणास खूप मोठा फायदा होऊ शकतो. या योजनेत घरच्या घरी आपण गोबरगॅस तयार करून त्याचा आपल्या स्वयंपाकघरात वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला खऱ्या अर्थाने गती देऊ शकता. (Prime Minister Narendra Modi’s Atmanirbhar Bharat Abhiyan)

Advertisement

Advertisement

Advertisement
Loading...

ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत (cooking fuel and organic manure) पुरविणे हा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. यासह भारताच्या ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठीचाही उद्देश आहे. तसेच बायोगॅस संयंत्रांस शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी (maintain general cleanliness and environmental balance) याद्वारे प्रयत्न चालू आहेत. केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप केले जाते. अशा पद्धतीने पर्यावरण पूरक अशी ही एक महत्वाची योजना आहे.

Advertisement

Advertisement

यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी (Agricultural Development Officer of the Zilla Parishad) आणि तालुका स्तरावर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी / कृषी अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे (Group Development Officer / Agricultural Officer / Extension Officer (Agriculture) in the Panchayat Samiti) किंवा आपल्याच ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक किंवा सरपंच (Gram Sevak or Sarpanch at your own Gram Panchayat) यांच्याकडे संपर्क साधावा. केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया (Ministry of New and Renewable Energy (MNRE) of the Central Government) मार्फत राबविली जाते. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 9,000 रुपये, अनुसूचित जाती व जमाती यामधील लाभार्थी यांच्यासाठी 11,000 रुपये प्रति संयत्र अनुदान मिळते. तसेच याला शौचालय जोडणी केल्यास 1,200 रुपये प्रति संयत्र अतिरिक्त अनुदान (additional subsidy) मिळते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply