World Economy : जगातील तब्बल 7 कोटी लोकांसमोर आलेय ‘हे’ संकट.. जागतिक अर्थव्यस्थेसाठी ठरेल धोक्याची घंटा..
World Economy : जागतिक नाणेनिधी (IMF) संघटनेचे म्हणणे आहे, की आगामी काळात जगासमोरील संकटात आणखी वाढ होणार आहे. पुढील वर्षी परिस्थिती आणखी बिघडू शकते. IMF प्रमुख क्रिस्टिलिना ज्योर्जिएवा यांनी म्हटले आहे, की 2022 कठीण आणि 2023 आणखी कठीण असेल. त्यांच्या मते, महागाईचा जास्त दर (High Inflation Rate) लवकर कमी होण्याची शक्यता नाही आणि यामुळे जगातील गरीब देशांमधील आणखी 7 कोटी लोक अत्यंत गरिबीच्या (Poverty) संकटात ढकलले जातील.
China Bank: म्हणून उतरवले रस्त्यावर रणगाडे..! पहा काय कारण घडले यामागे https://t.co/ddaHY13x9x
Advertisement— Krushirang (@krushirang) July 20, 2022
Advertisement
वाढत्या महागाईचा संदर्भ देत त्यांनी म्हटले आहे की, काही देशांनी अन्नधान्यांवर निर्बंध लादल्यामुळे खाद्य पदार्थांच्या समस्या वाढणार आहेत. बहुतेक गरीब देशांना पाच टक्क्यांपेक्षा जास्त महागाईचा सामना करावा लागत आहे आणि त्यांची परिस्थिती आगामी काळात आणखी बिकट होऊ शकते, ज्यामुळे अनेक देशांमध्ये समाजाच्या पातळीवर अस्थिरता निर्माण होऊ शकते. आयएमएफ प्रमुखांच्या मते, सध्या जगासाठी सर्वात मोठी काळजीची गोष्ट म्हणजे वाढता महागाई दर आहे. IMF च्या अंदाजानुसार, विकसित देशांमध्ये 2022 मध्ये महागाईचा दर 5.7 टक्के असू शकतो. त्याच वेळी, विकसनशील देशांमध्ये चलनवाढीचा दर 8.7 टक्के असू शकतो.
China Border: कुरापतखोर चीनने केली गुस्ताखी..! पहा उपग्रहाच्या फोटोत काय दिसतेय https://t.co/A4dat6O9cg
Advertisement— Krushirang (@krushirang) July 20, 2022
Advertisement
सध्या रशिया युक्रेन युद्धामुळेही (Russia Ukraine War) महागाईत वाढ झाली आहे. कारण या युद्धामुळे पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत झाली आहे. या देशांतून दुसऱ्या देशांना निर्यात (Export) होणाऱ्या वस्तू आता निर्यात होत नाहीत किंवा त्यांच्या पुरवठ्यात विस्कळीतपणा आला आहे. तसेच काही देशांना खाद्य पदार्थांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे जगभरात महागाईच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गरीब आणि विकसनशील देशांतील परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. या देशांतील गरीबी आणखी वाढत जाण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत ठोस निर्णय घेऊन परिस्थितीत सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, तसे ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत.