Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Auto News: दुर्दैवाने ‘त्यात’ भारताचा 13 % वाटा..! पहा काय कारनामा करतायेत भारतीय

Please wait..

Auto News: मुंबई : जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये जगातील सुमारे फक्त 1 टक्के वाहने आहेत. त्याचवेळी एकूण जागतिक रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये भारताचा वाटा तब्बल 13 टक्के आहे. 2020 मध्ये रस्ते अपघातात 1 लाख 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 70 टक्के 18-45 वयोगटातील होते. त्यापैकी अर्ध्याहून अधिक पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वार (pedestrians, cyclists and bike riders) होते. रस्ते अपघातांमुळे भारताला दरवर्षी जीडीपीच्या 3 टक्के नुकसान सहन करावे लागते. (World Bank, India has about 1 percent of the world’s vehicles, but India’s share in the deaths in accidents is 13 percent)

Advertisement

Advertisement

देशाला आता 2025 पर्यंत रस्ते अपघात निम्म्याने कमी करायचे आहेत, असे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून कार आणि वाहनांवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जात असल्याने ग्राहकांना कमी किमतीत वाहन खरेदी करताना मग सेफ्टी फीचर कमी असलेल्या कार खरेदी कराव्या लागत आहेत. सेफ्टी फीचर अनिवार्य करताना केंद्र आणि राज्य सरकार यांनी वाहनासाठी घेतला जाणारा कर कमी करण्याची गरज आहे. मात्र, याच महत्वाच्या मुद्याकडे देशाचे दुर्लक्ष होत आहे. असे अपघात रोखण्यासाठी एक मार्ग म्हणजे ऑटोमोबाईल सुरक्षा वैशिष्ट्यांचा प्रचार करणे. त्यामुळेच सहा एअरबॅग अनिवार्य करण्यासोबतच सरकार इंडिया NCAP (न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) लाँच करण्याची योजना आखत आहे. मात्र, कर कमी करण्याकडे अजिबात लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे चांगल्या कार सामन्यांच्या आवाक्यात नाहीत. (New Car Assessment Programme)

Advertisement

Advertisement
Loading...

भारत देशात NCAP ही कार सुरक्षा रेटिंग प्रणाली आहे. जी अपघाताच्या वेळी कारच्या कामगिरीवर आधारित एक ते पाच या रेटिंग स्केलवर कारच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करते. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Road Transport Minister Nitin Gadkari) यांच्या मते, यामुळे “भारताला जगातील नंबर एक ऑटोमोबाईल हब बनवण्याच्या मिशनला” चालना मिळेल. भारतात लोक कारच्या बाबतीत कटकसरीने पैसे खर्च करतात. स्थानिक पातळीवर तयार केलेल्या कारची किंमत 3 लाख 40 हजार रुपयांपासून ते 30 लाख रुपयांपर्यंत आहे. असे असूनही गेल्या काही काळापासून छोट्या कारची मागणी कमी झाली आहे. कच्चा माल आणि कारच्या वाढत्या किमतींमुळे छोट्या कारच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ज्या लोकांना दुचाकीनंतर कार घ्यायची होती, त्यांच्याही ते आवाक्याबाहेर गेले आहे. इंधनाचे दरही वाढले आहेत.

Advertisement

Advertisement

प्रदीर्घ आर्थिक मंदीमुळे बहुतांश भारतीयांचे उत्पन्न जवळपास थांबले आहे. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले लोक छोट्या कारऐवजी सेडान आणि युटिलिटी कार घेण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे छोट्या कारच्या बाजारपेठेला आणखी संकुचित होत आहे. मारुती सुझुकीचा (Maruti Suzuki) असा विश्वास आहे की गेल्या चार वर्षांत छोट्या कारच्या बाजारपेठेत 25% घट झाली आहे. (demand for small cars has decreased)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply