Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Parliament Monsoon Session: ‘त्या’ मुद्द्यावर रंगणार ‘असंसदीय’ चर्चा; मोदी सरकारच्या उत्तरकडे लक्ष

Please wait..

दिल्ली : सोमवारपासून संसदेचे पावसाळी (Parliament Monsoon Session) अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस झाले असूनही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा ठोस व यशस्वी प्रयत्न केलेला नाही. अर्थात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी अग्निपथ योजना (Agneepath scheme, inflation and the list of unparliamentary words), महागाई आणि असंसदीय शब्दांची यादी यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अजूनही म्हणावी अशी धार येऊ शकलेली नाही.

Advertisement

Advertisement
Loading...

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीव्यतिरिक्त, संपूर्ण अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्याचवेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, संसदेच्या या अधिवेशनात विविध विभागांकडून 32 विधेयके मांडण्याचे संकेत आहेत. त्यापैकी 14 विधेयके तयार आहेत. मात्र आम्ही चर्चेशिवाय अजिबात हे विधेयक मंजूर करणार नाही. सरकारने सर्वपक्षीय बैठकीसाठी सुमारे 45 पक्षांना आमंत्रित केले होते, त्यापैकी 36 पक्ष सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement

मंगळवारी विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज बुधवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले. सभागृहाचे दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी संसदेबाहेर निदर्शने केली. या निदर्शनात काँग्रेस नेते राहुल गांधीही (Congress leader Rahul Gandhi) सहभागी झाले होते. अधिवेशनापूर्वीही अनेक मुद्द्यांवरून गदारोळ झाला होता. जीएसटी दरवाढ आणि अग्निपथ योजनेवरून विरोधी पक्षांनी गदारोळ केला होता. आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) किंवा सत्ताधारी भाजपचे मंत्री (BJP ministers) काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply