Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Sri Lanka Crisis : आता चीन नाही तर भारत.. संकटकाळी भारताने श्रीलंकेला दिले ‘इतके’ कर्ज; जाणून घ्या..

Please wait..

Sri Lanka Crisis : 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत भारत श्रीलंकेला सर्वात मोठा कर्ज देणारा देश म्हणून उदयास आला आहे. भारताने(India) या चार महिन्यांत श्रीलंकेला $37.69 कोटी डॉलर कर्ज दिले. त्याचवेळी चीनने (China) श्रीलंकेला फक्त $6.790 कोटी डॉलर कर्ज दिले आहे. श्रीलंका (Sri Lanka) आजवरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाला तोंड देत आहे. 2.2 कोटी लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेची स्थिती परकीय चलनाअभावी अत्यंत वाईट आहे. अन्न, औषध आणि पेट्रोल-डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Advertisement

Advertisement

गेल्या महिन्यात, श्रीलंकेने परकीय कर्ज परत करण्यात टाळाटाळ केली आणि त्याची चलनवाढ जवळपास 50% ने वाढली आहे. बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देशातून पळ काढला आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. डेली मिरर (Daily Mirror) या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत वितरित केलेल्या पैशांच्या बाबतीत भारत कर्जदारांच्या यादीत आघाडीवर आहे. आशियाई विकास बँक (ADB) या कालावधीत $35.96 कोटी डॉलरसह दुसऱ्या क्रमांकाची कर्जदार होती. त्यानंतर जागतिक बँकेने (World Bank) श्रीलंकेला $6.73 कोटी डॉलर कर्ज दिले आहे.

Advertisement
Loading...

चीनने दिलेल्या कर्जाचे वर्णन या अहवालाने किरकोळ असे केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा श्रीलंकेला परकीय चलनाची तीव्र टंचाई जाणवू लागली तेव्हा भारत मदतीसाठी पुढे आला, असे अहवालात म्हटले आहे. 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत, श्रीलंकेला $0.7 दशलक्ष अनुदानासह $96.81 कोटी डॉलर विदेशी कर्ज मिळाले आहे.

Advertisement

Advertisement

2022 च्या सुरुवातीपासून श्रीलंकेला भारताच्या परकीय मदतीचे संपूर्ण पॅकेजचा समावेश आहे. इंधन, अन्न आणि औषधांच्या आपत्कालीन खरेदीसाठी भारताने श्रीलंकेला कर्ज (Loan) दिले. अहवालात म्हटले आहे की, “श्रीलंकेला वर्षाच्या सुरुवातीपासूनच डॉलरच्या कमतरतेचा सामना करावा लागत होता. तेव्हा पंतप्रधान ‘शेजारी प्रथम धोरणाअंतर्गत भारत सर्वात मोठा मदतनीस म्हणून पुढे आला होता. व्यापक अपेक्षा असूनही, चीनने श्रीलंकेला मदत करण्याकडे फारसे लक्ष दिले नाही, असे अहवालात म्हटले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply