Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Agriculture Licenses: कृषी सेवा केंद्र परवान्यासाठी बदलली पद्धत; पहा किती सोपे झालेय आता

Please wait..

Agriculture Licenses: अहमदनगर (Ahmednagar) : कृषी सेवा केंद्र (Krushi Seva Kendra Licenses) सुरू करण्यासाठी खते (fertilizers), बियाणे (seed) आणि किटकनाशके (insecticides) यांच्या विक्रीचे परवाने (selling Licenses) प्राप्त करून घ्यावे लागतात. मगच कृषी सेवा केंद्र सुरू करता येते. कायद्यानुसार हे बंधनकारक आहे. असे लायसन्स घेण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी सरकारच्या (Agriculture Department) ‘महाआयटी’च्या (MahaIT) ‘आपले सरकार’ पोर्टलवर (Aaple Sarkar Portal) ३१ जूलै २०२२ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

नगर जिल्ह्यातील कृषि विक्रेत्यांना खते, बियाणे आणि किटकनाशके विक्रीचे डिजीटल स्वाक्षरी असलेले परवाने प्राप्त करण्यासाठी यापुढे नवीन ऑनलाईन प्रणाली विकसित झालेली आहे. सदरचे परवाने जून्या प्रणालीमधून देण्याचे आता पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. परवान्याचे नूतनीकरण आणि सुधारणा  या बाबीही यापुढे नवीन परवाना प्रणालीमधूनच करावयाची आहेत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये ज्या विक्रेत्यांचे वैध परवाने आणि वैधता संपलेले परवाने अशा सर्व विक्रेत्यांनी आपले परवान्यांची ‘आपले सरकार’ या पोर्टलवर (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) ऑनलाईन नोंदणी (Online Registration procedure for Krushi Seva Kendra Licenses) करणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement

या प्रक्रियेत आता सर्व विक्रेत्यांना घरबसल्या नोंदणी करुन कृषी सेवा केंद्र परवाना प्राप्त करुन घेता येईल. मात्र, यासाठी परवाना धारकांना त्यांचा सद्यस्थितीतील वैध परवाना नवीन प्रणालीवरच कार्यान्वित करावा लागणार आहे. तसेच ज्या विक्रेत्यांच्या परवान्याची मुदत ३१ जूलै च्या पुढे आहे त्यांनी देखील या नव्याने विकसित झालेल्या ऑनलाईन प्रणालीवर आपला परवाना अद्ययावत करावयाचा आहे. असा परवाना अद्ययावत करण्यासाठी कोणतेही वेगळे शूल्क भरण्याची गरज नाही. मात्र, आता नव्या पद्धतीने नोंदणी न केल्यास सद्यस्थितीतील परवाना रद्द समजण्यात येईल आणि त्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply