Auto News: मुंबई : जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या (prices of petrol and diesel) किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत मोठी (market for electric vehicles is growing) वाढ होत आहे. दर आठवड्याला काही नवीन ईव्ही (electric vehicle) बाजारात उपलब्ध होत आहेत. मात्र, यादरम्यान काही वाहनांच्या समस्या व अडचणी समोर आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत विविध ठिकाणी EV बाईकच्या बॅटरीशी सबंधित आगीच्या घटना घडल्या होत्या. यात जीवित हानीही झाली होती. यादरम्यान विश्वासू असणाऱ्या टाटा कंपनीच्या नेक्सॉन ईव्हीलाही आग लागल्याचीही घटना ताजीच आहे. (incident of the Nexon EV of the trusted Tata company also catching fire is also a recent incident)
ईव्हीमध्ये बिघाड होण्याचे मुख्य कारण म्हणजे या वाहनांची लौंच करण्याआधी योग्य प्रकारे चाचणी न करणे. आता कंपन्या गाडी लौंच करण्याआधी चाचणी का करत नाही? हे समजून घेणे गरजेचे आहे. सध्या सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत आपले मार्केट वाढवण्याचा व या सेक्टरमधील मार्केट काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना वाहनांच्या चाचणीत जास्त वेळ घालवायचा नाही. याच कारणामुळे या अशा आगीच्या दुर्घटना घडत आहेत.
दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कार निर्माता कंपनी टोयोटाने आपल्या शेकडो इलेक्ट्रिक गाड्या (Toyota has recalled hundreds of its electric cars) परत मागवल्या आहेत. त्यांच्या वाहनांमध्ये सुरू असलेल्या समस्यामुळे तब्बल 2700 इलेक्ट्रिक गाड्या परत बोलवण्यात आलेल्या आहेत. टोयोटाच्या P.R.O. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने इलेक्ट्रिक कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण गाडी चालवताना गाडीची चाके निखळली जाऊ शकतात. आणि चुकून एखाद्या घटनेत हा प्रकार घडला तर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. म्हणून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गाड्या परत मागवल्या आहेत. (wheels of the car can come off while driving)