Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Amazon वर सुरु होतंय Monsoon Store; ‘या’ वस्तूंवर मिळणार बंपर सूट

Please wait..

Amazon Monsoon Store: पुणे : पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेक ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर (Online Shopping Site) मान्सून सेल सुरु होतात आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देखील वस्तूंवर दिल्या जातात. आता अमेझॉन देखील लवकरच आपला प्राइम डेज सेल (Prime Days Sale) सुरु करणार असून कंपनीने मान्सून स्टोअर्सवर याबद्दलच्या काही डील्स जाहीर केल्या आहेत. प्राइम डेज सेल 23 आणि 24 जुलै रोजी होणार आहे. असं असलं तरी या दोन दिवसांव्यतिरिक्त तुम्ही मान्सून स्टोअरमधून आकर्षक सवलतीत अनेक वस्तू खरेदी करू शकता. फक्त इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सचं नाही तर इतरही दैनंदिन गरजांच्या वस्तूंवर यामध्ये ऑफर मिळणार आहे.

Advertisement

Advertisement

Amazon Monsoon Store वर एनर्जी ड्रिंक्सवर 50 टक्के, पावसाळ्यात वापरात येणाऱ्या अनेक वस्तूंवर 40 ते 50 टक्के डिस्कांउंट देण्यात येणार आहे.  इन्व्हर्टर, बॅटरी आणि इतर लाईट्सवर देखील आकर्षक ऑफर्स मिळणार आहे. Amazon Monsoon Store मधून 6,999 रुपयात वॉशिंग मशीन खरेदी करण्याची नामी संधी मिळणार आहे. यामध्ये जर SBI कार्डचा वापर केल्यास 10% सूट मिळेल. HDFC कार्डवर 1750 रुपयांचा  इनस्टंट डिस्काउंट मिळेल. यासोबतच येस बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळेल. (bank credit / debit cards offers)

Advertisement
Loading...

(7) Krushirang on Twitter: “OBC Reservation : आरक्षणावरून महाराष्ट्रात मोठी घडामोड..! मगच पुढचा निर्णय https://t.co/bCeZQl0juF” / Twitter

Advertisement

गरजेच्या काही वस्तू अगदी 99 रुपयांपासून सुरु होणार आहेत. तुम्ही वॉटर प्युरिफायर, स्टीमर, थर्मामीटर यासारख्या वस्तू अत्यंत चांगल्या डिस्काऊंटवर खरेदी करू शकता. याशिवाय टीव्ही, वॉशिंग मशिन आणि एसी वरही सवलत देण्यात येत आहे. तुम्ही 99 रुपयांपासून क्लींजिंग उत्पादने खरेदी करू शकता. ग्रूमिंग उत्पादनांवर, स्वयंपाकघरातील वस्तूंवरदेखील चांगला डिस्काउंट उपलब्ध आहे.  एअर फ्रायर, टोस्टर आणि इतर वस्तू देखील स्टोअरमध्ये डिस्काऊंट आणि आकर्षक ऑफरसह उपलब्ध आहेत.

Advertisement

(7) Krushirang on Twitter: “Business News: मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध व्यापारी आक्रमक; शेतकऱ्यांना व सामान्यांना झटका https://t.co/yYW3ILnyUX” / Twitter

Advertisement
Advertisement

Leave a Reply