Business News: मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध व्यापारी आक्रमक; शेतकऱ्यांना व सामान्यांना झटका
Business News: अहमदनगर (Ahmednagar) : किराणा दुकानातील अन्नधान्य व खाद्यान्न्य वस्तूवर केंद्र सरकारने पाच टक्के जीएसटी (5 % GST on agriculture food item) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका व्यापारी (Businessman) व सर्वसामान्य जनतेला (Common Man) बसणार आहे. त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Government) यांच्या सरकारने अजिबात लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता व्यापारी आक्रमक झालेले आहेत. तर, या निर्णयामुळे सामान्य कुटुंबांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण भारतभर आज दि 16 जुलै रोजी भारत बंदचा (Bharat Band) संप पुकारला आहे. यामध्ये नगर शहरांमधील व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद ठेवून केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात बंदची भूमिका घेतली आहे. या भारत बंद आंदोलनाच्या भूमिकेत नगर शहरातील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला व कडकडीत बंद पाळला. यावेळी व्यापारी संतोष बोरा, राजेंद्र बोथरा, अशोक गांधी, अशोक भंडारी, सतीष गुंदेचा, संजय लोढा, सुरेश भंडारी, गोपाळ मणियार, राजकुमार शेटीया, अतुल शेटीया, रितेश पारीक, संजय लोढा, राकेश मेहतांनी, प्रेमराज पितळे, दीपक बोथरा, प्रकाश फिरोदिया, शिवकांत हेडा आदि यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारने २०१७ साली व्यापाऱ्यांना सांगितले होते की, अन्नधान्य व खाद्यवस्तूवर जीएसटीकर लावण्यात येणार नाही या सर्व वस्तू करमुक्त होत्या त्यानंतर ब्रँडेड वस्तूंवर कर लावला आता तर अन्नधान्य व खाद्य वस्तूंवर पाच टक्के जीएसटीकर लावल्यामुळे व्यापाऱ्यासह शेतकरी व सर्वसामान्य जनता होरपळून निघणार आहे या निर्णयाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये त्रिव्र स्वरूपाची संतापाची लाट निर्माण झाली आहे. पूर्वी जीवनावश्यक खाद्य वस्तूंवर कुठलाही कर नव्हता मात्र १८ जुलै रोजी या वस्तूंवर कर लावल्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार पॅकिंग केलेल्या आणि लेबल लावलेल्या डाळी, कडधान्य, आटा, रवा, मैदा, दुधाचे पदार्थ या सर्व वस्तूवर ५ टक्के जीएसटी लागू होणार आहे त्यामुळे जीएसटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली.