Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

America : आश्चर्यच म्हणायचे..! कट्टर शत्रू रशियाची मदत घेणार अमेरिका; पहा, नेमके काय घडले ?

Please wait..

America : युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियाला जगापासून एकटे पाडण्यात अमेरिका नेहमीच आघाडीवर होता. यासाठी अमेरिकेने अनेक प्लान तयार केले. कधी आपल्या बळाच्या जोरावर तर कधी अन्य देशांच्या कमकुवतपणाचा फायदा घेत त्यांना रशियाच्या विरोधात उभे केले. आता मात्र एक आश्चर्यात टाकणारी बातमी आली आहे. अमेरिकेलाच रशियाला बरोबर घेत काम करणे भाग पडले आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय अंतरीक्ष स्टेशनच्या संबंधित आहे. निर्बंधांना न जुमानता अमेरिका (America) रशियासोबत (Russia) आयएसएसवर उड्डाणे पाठवणार असल्याचे वृत्त आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करूनही रशियासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठी उड्डाणे पुन्हा सुरू करणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

विशेष म्हणजे, युक्रेनवर लष्करी हमल्यानंतर (Russia Ukraine War) अमेरिकेने रशियाला शिक्षा देण्यासाठी अनेक निर्बंध लादले आहेत. चार अमेरिकन, दोन रशियन आणि एक जर्मन अंतराळवीर युक्रेन युद्धापासून या प्रकल्पावर मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये कार्यवाही करत आहेत. “आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे सुरक्षित ऑपरेशन चालू ठेवण्यासाठी, अंतराळवीरांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी आणि अंतराळात अमेरिकेची सतत उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी, नासा अमेरिकन क्रूड  क्राफ्ट आणि रशियन सोयुजचे संचालन सुरू ठेवेल,” असे नासाने (NASA) म्हटले आहे. अंतराळवीर फ्रँक रुबिओ दोन रशियन अंतराळवीरांसोबत 21 सप्टेंबर रोजी कझाकस्तानमधून प्रक्षेपित होणार्‍या सोयुज रॉकेटवर उड्डाण करतील, असे नासाने सांगितले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियाच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांना काढून टाकल्यानंतर काही तासांनी ही घोषणा केली गेली आहे.

Advertisement

Advertisement

NASA ने सांगितले की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन नेहमीच अमेरिका, रशिया, युरोप, जपान आणि कॅनडाच्या अंतराळ संस्थांच्या सहभागासह संयुक्तपणे कार्यवाही करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply