Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BJP : 2024 साठी भाजपने केला मोठा प्लान.. ‘त्या’ 141 मतदारसंघांसाठी आखली ‘ही’ रणनिती; जाणून घ्या..

Please wait..

BJP : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election ) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात भाजपला 2019 पेक्षा मोठा विजय मिळाला, त्यासाठी पक्षाने आतापासून मिशन 2024 वर रणनीती आखून कामाला सुरुवात केली आहे. 2019 च्या निवडणुकीत ज्या 141 जागांवर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्या 141 जागांवर विजयाचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. काही बडे केंद्रीय मंत्री सोडले तर जवळपास सर्वच मंत्री या कामात गुंतले आहेत. मंत्र्यांना जागानिहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, ते आपापल्या भागात फिरून आणि बैठका घेऊन विजयासाठी प्रभावी रणनीती आखतील.

Advertisement

Advertisement

सूत्रांवर विश्वास ठेवला तर ज्या मंत्र्यांना 141 जागा जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, ते पुढील दोन वर्षे म्हणजे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत या भागात काम करतील आणि जिंकण्याची रणनीती तयार करतील. 2019 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) गमावलेल्या 14 जागांवर 2024 मध्ये पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाने चार गट तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये सपा, बसपा, काँग्रेसच्या (Congress) ताब्यातील जागांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सहारनपूर, नगीना आणि बिजनौरची जबाबदारी देण्यात आली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर रायबरेली, मऊ, घोसी, श्रावस्ती या जागांचा पदभार स्वीकारणार आहेत. राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे मुरादाबाद, अमरोहा आणि मैनपुरीचे काम पाहतील. त्याचबरोबर राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे जौनपूर, गाझीपूर आणि लालगंजची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशशिवाय आरोग्यमंत्र्यांना लुधियाना, पंजाबमधील संगरूर आणि हिमाचल प्रदेशातील मंडी या जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा आणि औरंगाबादच्या जागा जिंकण्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव रणनीती बनवणार आहेत. त्याचवेळी बारामतीमध्ये विजयाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अन्य राज्यांतील मतदारसंघांबाबतही जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.

Advertisement

गेल्या अनेक दशकांपासून कमलनाथ यांच्या ताब्यात असलेल्या मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छिंदवाडा आणि छत्तीसगडमधील कोरबा या जागांवर पक्षाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या खांद्यावर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे केरळमधील त्रिशूर आणि उत्तर प्रदेशातील संभल मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. तेलंगणातील नलगोंडा आणि नागरकुर्नूल या जागांवर पक्षाने विजय मिळवण्याची जबाबदारी महेंद्रनाथ पांडे यांच्यावर आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply