Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Petrol price: मोठी बातमी.. इथे पेट्रोल 18 तर डिझेल 40 रुपयांनी स्वस्त, पंतप्रधानांची घोषणा

Please wait..

Petrol price: सरकारी तेल कंपन्यांनी आज (16 जुलै) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol and diesel price) जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील दिलासा सरकारने आजही कायम ठेवला आहे. गेल्या वेळी 21 मे रोजी केंद्र सरकारने (Central government) पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. केंद्रातील मोदी सरकारने (Modi government) 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Advertisement

पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
महागाईने होरपळत असलेल्या पाकिस्तान (Pakistan) या शेजारील देशात सरकारने जनतेला काहीसा दिलासा दिला आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 18.50 रुपये आणि डिझेलच्या दरात 40.54 रुपयांची कपात केली आहे. पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ यांचे सरकार आल्यापासून ते चार वेळा पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

नवीन दर जाहीर केले
देशाला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने खाली येत आहेत. कच्चे तेल प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, आता पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होतील. पाकिस्तानमध्ये पेट्रोलची नवीन किंमत 230.24 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 236 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

Advertisement

Advertisement

भारतात आजची किंमत किती आहे?
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

Advertisement
Advertisement

Leave a Reply