Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Education News : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.. नगर जिल्ह्यात अकरावी प्रवेश सुरू; जाणून घ्या, वेळापत्रक

Please wait..

Education : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता जुलै महिन्यात अकरावीसाठी प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने (Education Department) याबाबत परिपत्रक काढले असून जिल्ह्यातील महाविद्यालयांना (Colleges) प्रवेशाबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 11 जुलैपासून अकरावी प्रवेशास सुरूवात करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून 1 ऑगस्टपासून नियमित वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

Advertisement

Advertisement

शिक्षण विभागाने जिल्ह्यातील महाविद्यालयांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रवेश देताना अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत या क्रमाने प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यालयाच्या मान्य प्रवेश क्षमतेनुसारच प्रवेश द्यावेत, वीस टक्के अनुदान घेत असलेल्या विद्यालयांनी त्या प्रमाणात विनाअनुदानितचे शुल्क आकारणी करावी.

Advertisement
Loading...

सध्या दहावीच्या राज्य मंडळाचाच निकाल हाती आला आहे. सीबीएसई, सीआयएसई, आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी, एनओएस या मंडळांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे सदर मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. महाविद्यालयांना आता या मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवाव्या लागणार आहेत. या  वेळापत्रकानुसार आता जिल्ह्यातील महाविद्यालयांनी अकरावीचे प्रवेश सुरू केले आहेत. प्रवेशाबाबत कार्यवाही पूर्ण केल्यानंतर नियमितपणे अकरावीचे वर्ग सुरू होतील.

Advertisement

Advertisement

असे आहे वेळापत्रक

Advertisement

11 ते 17 जुलै – ऑफलाइन अर्ज विक्री
18 ते 19 जुलै – अर्जांची छानणी करून गुणवत्ता यादी
20 जुलै – सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
21 जुलै – गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती स्वीकारणे
22 जुलै – पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
23 जुलै ते 27 जुलै – पहिल्या यादीनुसार प्रवेश देणे
28 जुलै – दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
28 जुलै ते 2 ऑगस्ट – दुसर्‍या यादीनुसार प्रवेश
3 ऑगस्ट – तिसरी गुणवत्ता यादी
4 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट – तिसर्‍या यादीनुसार प्रवेश
9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट – जागा शिल्लक राहिल्यास गुणवत्तेनुसार प्रवेश देणे

Advertisement
Advertisement

Leave a Reply