Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Petrol Price : कच्च्या तेलामुळे मिळाला मोठा दिलासा; पहा, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का..

Please wait..

Petrol Price : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर (Crude Oil Prices) 100 डॉलरच्या आसपास आहेत. शनिवारी सकाळी ब्रेंट क्रूड $ 101 च्या जवळ व्यवहार करत होते. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) ने विश्वास व्यक्त केला आहे, की आगामी काळात इंधनाचा वापर कमी होईल, ज्यामुळे क्रूड अधिक स्वस्त होईल.

Advertisement

कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने कमी होत असताना सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) किरकोळ दरही जाहीर केले आहेत, ज्यामध्ये शनिवारीही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत (Delhi) अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. तर क्रूडच्या किमती एकदा प्रति बॅरल $ 140 वर गेल्या होत्या. आता क्रूड 100 डॉलरच्या जवळ असताना आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. तसेच मुंबईमध्ये पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर, नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर झाले आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे. पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

Advertisement

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी (Excise Duty), डीलर कमिशन, व्हॅट (VAT) आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply