Ahmednagar Agniveer free Army training scheme: अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील (Police and Army pre-recruitment training centre) राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत (Integrated Tribal Development Project office at Rajur in Akole) कार्यरत असलेल्या पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण (Agniveer Army scheme) केंद्र मवेशी ता.अकोले येथे आदिवासी मुलांसाठी निवासी व भोजन व्यवस्थेसह ४ महिने कालावधीचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. (free training with accommodation and food for tribal children)
Agriculture Education: MPKV चा ‘मरडॉक’बरोबर करार; कृषीच्या विद्यार्थ्यांना होणार ‘असा’ फायदा https://t.co/ngHdEzlOWC
Advertisement— Krushirang (@krushirang) July 15, 2022
Advertisement
१ ऑगस्ट, २०२२ ते दिनांक ३० नोव्हेंबर, २०२२ ह्या कालावधीत आयोजित प्रशिक्षणात सहभागी होण्याकरिता आदिवासी मुलांसाठी प्रशिक्षणास आवश्यक पात्रता पुढिल प्रमाणे आहेत. प्रशिक्षणार्थीचे वजन किमान ५० कि. ग्रॅ. असावे तसेच वय १८ ते २४ वर्ष व उंची कमीत कमी १६५ सें.मी. असावी. २ फोटो, आधार कार्ड, जातीचा दाखला, इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, १२ वी पास शाळा सोडल्याचा दाखला, रहिवाशी दाखला किंवा रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
Adani Vs Ambani: अंबानींना आता अदानी झटका; दोन गुजरातींमध्ये त्यावर पेटणार बिजनेस वॉर https://t.co/fUloTteqWP
Advertisement— Krushirang (@krushirang) July 15, 2022
Advertisement
शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षेद्वारे प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येईल. यासंबंधीचे अर्ज १२ ते २६ जुलै,२०२२ पर्यंतच ऑफलाईन पद्धतीने स्विकारले जातील. या मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे अर्ज भरण्यात येतील. इच्छुक उमेदवारांनी दिनांक २८ जुलै २०२२ रोजी पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी ता.अकोले येथे सकाळी ९.३० वाजता मुळ कागदपत्र व झेरॉक्स कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ८२७५३४९४१४ / ९९६०११२६०० / ९४२१५२५४१६ / ८८०५६९८९४५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजुर, ता.अकोले, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
Elon Musk: टेस्लाला झटका..! कार्यालयही केले बंद..! पहा कितीजणांना बसलाय फटका https://t.co/HDFgLwyLTb
Advertisement— Krushirang (@krushirang) July 14, 2022
Advertisement