Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Onion Price : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. ‘येथे’ कांद्याला मिळतोय ‘इतका’ भाव; जाणून घ्या..

Please wait..

Onion Price : सध्या बाजार समितीत कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचा विचार केला तर येथे एक नंबर कांद्याला (Onion Price) सरासरी 1700 ते 1800 रुपये प्रति क्विटल दरम्यान भाव मिळत आहेत. सध्या बाजार समितीत (Market Committee) कांद्याची आवक वाढली आहे. गुरूवारी नगर जवळील नेप्ती उपबाजार समितीत एकूण 28 हजार 691 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. आवक वाढली असली तरी भाव मात्र कमी झालेले नाहीत. गुरूवारी कांद्याचे भाव वाढल्याचे दिसले.

Advertisement

Advertisement
Loading...

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी लिलावासाठी 28 हजार 691 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 1350 ते 1850 रुपये, दोन नंबर कांद्याला 950 ते 1350 रुपये, तीन नंबर कांद्याला 550 ते 950 रुपये आणि चार नंबर कांद्याला 150 ते 550 रूपये बाजारभाव मिळाला. मागील काही दिवसांपासून कांद्याला याच पद्धतीने भाव मिळत आहेत. सध्या कांद्याची आवक वाढली आहे. तरी देखील भाव कमी झालेले नाहीत. कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे कांद्याला नेहमीपेक्षा जास्त भाव मिळत आहे. गुरुवारी बाजार समितीत कांद्याला सरासरी 1850 रुपयांपर्यंत भाव मिळाला. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही याच पद्धतीने भाव मिळत आहेत.

Advertisement

Advertisement

काही दिवसांपूर्वी कांद्याची आवक घटली होती. त्यावेळी भावही कमी मिळत होते. मात्र, मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर कांदा आवकेत वाढ होण्यास सुरुवात झाली. आजमितीस सरासरी 30 हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. आवक वाढली असली तरी भाव मात्र फारसे कमी झालेले नाहीत. मागील दीड महिन्यापासून नगरसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांत कांद्याला साधारण 1700 ते 1800 रुपयांदरम्यान भाव मिळत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply