Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Petrol Price : आजपासून पेट्रोल मिळणार 5 रुपये स्वस्त; जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे भाव..

Please wait..

Petrol Price : पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर (Petrol Diesel Price)करण्यात आले आहेत. आज शुक्रवार महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे. आजपासून राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. नव्या सरकारने पहिल्याच निर्णयात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काही प्रमाणात कमी करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी महाराष्ट्र (Maharashtra) वगळता इतर राज्यांमध्ये सलग 55 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे. दरम्यान, कच्चे तेल प्रति बॅरल (Crude Oil Price) $100 च्या खाली 98.61 वर आले आहे.

Advertisement

महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रति लिटरने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी दिली. गुरुवारी मुंबईत (Mumbai) पेट्रोल 111.35 रुपये आणि 97.28 रुपयांना विकले जात होते.

Advertisement

Advertisement
Loading...

सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये तर डीझेल 89.62 रुपये दराने विक्री होत आहे. तसेच मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये, डीझेल 94.27 रुपये, चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये, डीझेल 94.24 रुपये, कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डीझेल 92.76 रुपये, लखनऊ पेट्रोल 96.57 रुपये, डीझेल 89.76 रुपये, पटना पेट्रोल 107.24 रुपये, डीझेल 94.02 रुपये, भोपाळ पेट्रोल 108.65 रुपये, डीझेल 93.90 रुपये, रांची पेट्रोल 99.84 रुपये, डीझेल 94.65 रुपये, आणि जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये, डीझेल 93.72 रुपये दराने विक्री होत आहे.

Advertisement

Advertisement

दरम्यान, राज्य सरकारने इंधनावरील कर कमी केल्यामुळे किंमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. मात्र, यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल अशी परिस्थिती नाही. कारण, मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. कधी नव्हे ते पेट्रोलने शंभरचा टप्पा पार केला आहे. अशा परिस्थितीत 5 किंवा 3 रुपये कमी करून काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply