BSNL : सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL ने एक नवीन प्रीपेड प्लान (Prepaid Recharge Plan) लाँच केला आहे. जरी रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) आणि एअरटेल (Airtel) सारख्या लोकप्रिय कंपन्यांकडे भरपूर प्रीपेड प्लान आहेत. परंतु हा प्लान आल्यानंतर या कंपन्या बीएसएनएलशी स्पर्धा करू शकणार नाहीत, हे नक्की.
BSNL ने नुकताच सर्वात स्वस्त डेटा प्लान जाहीर केला आहे. वास्तविक, BSNL ने एक प्रीपेड प्लान लाँच केला आहे जो 1 रुपये किमतीत 1 GB डेटा देईल. हा प्लान इतर लोकप्रिय कंपन्यांना कठीण स्पर्धा देत आहे. कंपन्यांनी कितीही प्रीपेड प्लान आणले तरी बीएसएनएलला कोणीही हरवू शकणार नाही. याशिवाय कंपनीने आणखी एक प्लान सादर केला आहे, जो अतिशय कमी खर्चात डेटा देत आहे.
बीएसएनएलचा 347 रुपयांचा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह (Validity) येतो. यामध्ये दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजे युजरला एकूण 112 जीबी डेटा मिळतो. 1 जीबी डेटाची किंमत मोजली तर दररोज सुमारे 3 रुपये खर्च येतो. डेटा ऑफर करण्याव्यतिरिक्त, प्रीपेड प्लान अमर्यादित कॉल, 100 एसएमएस देखील देतो.
Goverment scheme: सरकारच्या ‘या’ सुपरहिट योजनेत गुंतवा 1 रुपये अन् मिळवा 15 लाख https://t.co/wS4BSDMRPJ
Advertisement— Krushirang (@krushirang) July 14, 2022
Advertisement
रिलायन्स जिओ 84 जीबी डेटा देतो
जेव्हा आम्ही या प्रीपेड प्लानची इतर कंपन्यांच्या प्लानबरोबर तुलना करतो, तेव्हा रिलायन्स जिओ 479 रुपयांमध्ये 56 दिवसांची वैधता ऑफर करते. या प्लानमध्ये दररोज 1.5 जीबी डेटाही मिळतो. अशा प्रकारे, कंपनी एकूण 84 GB डेटा मिळतो आणि BSNL च्या प्लानपेक्षा ते 28 GB कमी आहे.
Jio ने आणला ‘हा’ जबरदस्त प्लान.. फक्त एकाच रिचार्जमध्ये 5 लोक टेन्शन फ्री; जाणून घ्या, कसे ते.. https://t.co/zo7uvpvZPo
Advertisement— Krushirang (@krushirang) July 14, 2022
Advertisement
Airtel 56 GB डेटा देतो
त्याच वेळी, एअरटेल 359 रुपयांचा प्लान ऑफर करते, ज्यामध्ये 2 जीबी डेटा मिळतो. हा प्लान फक्त 28 दिवसांसाठी वैध आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल, दररोज 100 एसएमएस. अशा प्रकारे, कंपनी एकूण 56 GB डेटा देते. यावरून बीएसएनएल प्रीपेड प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक फायदेशीर असल्याचे दिसून येते.