Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : सावधान..! कोरोनाचा वेग वाढलाय.. मागील 24 तासांत सापडलेत ‘इतके’ रुग्ण..

Please wait..

Corona Update : कोरोना हा घातक साथरोग पुन्हा वेगात फैलावत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 20 हजार 139 नवीन रुग्ण (Corona Virus Patient) आढळले आहेत. या कालावधीत 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत एका दिवसात नवीन रुग्णांच्या संख्येत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता देशभरात अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 1 लाख 36 हजारांच्या पुढे गेली आहे. तर दैनंदिन सकारात्मकतेचा दर (Positivity Rate) 5.1% वर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 16,482 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.

Advertisement

Advertisement
Loading...

बुधवारी महाराष्ट्रात (Maharashtra) आणखी 2 हजार 575 रुग्ण आढळले असून 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 80,10,223 वर गेली आहे, तर मृतांची संख्या 1,48,001 वर गेली आहे. मंगळवारी राज्यात 2435 रुग्ण आढळले असून कोविडमुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत (Mumbai) गेल्या 24 तासांत 383 नवे बाधित आढळले आहेत.

Advertisement

Advertisement

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) गेल्या 24 तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे 386 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह बुधवारपर्यंत राज्यातील कोविड-19 बाधित लोकांची एकूण संख्या 11,57,290 झाली आहे. बुधवारी राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. देशात काही राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. सध्या कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे कोरोना फैलावण्यास अनुकूल वातावरण आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. हा आजार पुन्हा वाढू द्यायचा नसेल तर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे जास्त महत्वाचे आहे. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. काही ठिकाणी लसीकरणाचा (Covid Vacination) वेगही कमी झाल्याचे दिसत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply