Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Lay off: अर्र.. ‘या’ दिग्गज कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना दिला झटका ; कारण जाणून तुम्ही व्हाल थक्क

Please wait..

Lay off: दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरून काढून टाकले आहे. याआधी जगातील अनेक मोठ्या कंपन्याही आर्थिक मंदीचे कारण देत आपले कर्मचारी कमी करत आहेत. सत्या नडेला संचालित मायक्रोसॉफ्ट ‘पुनर्रचना’चा भाग म्हणून कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी पहिली टेक कंपनी बनली आहे. यानंतर कंपनीने यावर स्पष्टीकरणही दिले आहे.

Advertisement

मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयात आणि उत्पादन विभागातील 1.81 लाख कर्मचार्‍यांपैकी सुमारे 1 टक्के, म्हणजेच सुमारे एक टक्के कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांत पहिल्यांदाच या टाळेबंदीची बातमी समोर आली आहे.

Advertisement

Advertisement

टाळेबंदीचे कारण काय?
टाळेबंदीनंतर, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘सर्व कंपन्यांप्रमाणे आम्ही नियमितपणे आमच्या व्यवसायाच्या प्राधान्यांचे मूल्यांकन करतो आणि त्यानुसार संरचनात्मक समायोजन करतो. येत्या वर्षभरात आम्ही आमच्या व्यवसायात गुंतवणूक करत राहू आणि एकूण कर्मचारी संख्या वाढवू.

Advertisement

Advertisement
Loading...

नोकरीत घट
यासोबतच आम्ही तुम्हाला सांगतो की मायक्रोसॉफ्टने विंडोज, टीम्स आणि ऑफिस ग्रुप्समधील नोकरभरतीही कमी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, कंपनीच्या प्रवक्त्याने या माहितीला दुजोरा दिला आहे की काल त्यांनी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे निर्णय घेतला आहे.   याव्यतिरिक्त, नफ्याच्या आघाडीवर, मायक्रोसॉफ्टने तिसर्‍या तिमाहीत मजबूत कमाई नोंदवली, ज्यामध्ये क्लाउड रेव्हेन्यूमध्ये 26 टक्के वाढ झाली (वर्षानुवर्षे) आणि एकूण कमाई $49.4 अब्ज.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

अनेक कंपन्यांनी कामगार कपात केली
याशिवाय अनेक दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तत्पूर्वी, ट्विटरने आपल्या भर्ती टीममध्ये 30 टक्के कपात केली आहे, तर एलोन मस्क-चालित टेस्ला देखील सतत शेकडो कर्मचार्‍यांना काढून टाकत आहे. याशिवाय Nvidia, Snap, Uber, Spotify, Intel आणि Salesforce या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply