Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Vice President Election : कोण असेल उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ? ; पहा, कोण आहे आघाडीवर..

Please wait..

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप आपल्या कॅडरशी संबंधित वरिष्ठ नेत्याला उमेदवारी देऊ शकते. सामाजिक आणि प्रादेशिक समतोल लक्षात घेऊन पश्चिम किंवा उत्तर भारतातील नेत्याचा विचार केला जाऊ शकतो. उमेदवाराबाबत भाजप (BJP) नेतृत्व एक-दोन दिवसांत मित्रपक्षांबरोबर चर्चा करणार आहे. यानंतर पक्ष एनडीएच्या (NDA) उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा करेल. उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै आहे.

Advertisement

राज्यसभेच्या (Rajyasabha) कामकाजात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी भाजप नेतृत्व आपल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याला उमेदवारी देण्याची अधिक शक्यता आहे. विशेष म्हणजे, भाजप आणि एनडीएकडे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे या पदासाठी भाजप आधिक विचार करून निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

भाजपने राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिला आणि पूर्व भारतातील उमेदवार दिल्याने आता उपराष्ट्रपती पदासाठी पश्चिम भारतातील किंवा अन्य कोणत्याही भागातील नेत्याला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu)यांना दुसरी टर्म देण्यासह नवीन उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपने आतापर्यंत सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. मात्र, यावेळी पक्ष नव्या नेत्याला उमेदवारी देणार असल्याचे संकेत आहेत.

Advertisement

Advertisement

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, बंडारू दत्तात्रेय, थावरचंद गेहलोत, मुख्तार अब्बास नक्वी, सुमित्रा महाजन, सुरेश प्रभू इत्यादी नावांवर विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय नेतृत्व सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांच्या नावावरही विचार करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदासाठी भाजप कुणाला उमेदवारी देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply