Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Ashok Stambh: बामणी भाषेत बोलायचं तर ‘विचकट’ आणि ‘हिडीस’

Please wait..

Ashok Stambh: सध्या सेंट्रल व्हिस्टा अर्थात नव्या संसद भवनाच्या (Central Vista, the new parliament building) बांधकामाने गती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमला (Prime Minister Narendra Modi’s team) देशात ‘नवा भारत’ (new India) घडवताना जुने बासनात गुंडाळायचे आहे. वेळोवेळी ते स्पष्ट झालेले आहे. आताही अशोक स्तंभावरील राजमुद्रेतील सिंहांच्या मुद्रा बदलून ‘नवा भारत’ प्रत्युत्तर देणारा (changing the posture of the lion on the Ashoka pillar) असल्याचे सांगताना विचकट झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाल्याची टीका होत आहे. त्यावर लेखक श्रीकांत ढेरंगे (Writer Shrikant Dherange) यांनी त्यांच्या फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. आम्ही ही जशीच्या तशी प्रसिद्ध करीत आहोत.

Advertisement

https://www.facebook.com/photo?fbid=10219316392571631&set=pcb.10219316046722985

Advertisement

अशोक स्तंभावरील राजमुद्रेतील सिंहांच्या मुद्रा बदलण्यात आल्या आहेत. त्या अत्यंत पुणेरी बामणी भाषेत बोलायचं तर ‘विचकट’ आणि ‘हिडीस’ अशाच दिसत आहेत. नव्या मुद्रा या थकलेल्या, अधिक वृद्धावस्थेतील, समोरून कुणीतरी हल्ला करणार आहे, आता आपली काहीच धडगत नाही म्हणून अत्यंत भीतीपोटी चवताळलेल्या अवस्थेतील आहेत. म्हणजेच अत्यंत असुरक्षित अशा अवस्थेतील भासत आहेत. त्यांनी वासवलेले जबडे हे अत्यंत उदास असे भासतात. अत्यंत आळशी अवस्थेतील, कुणीतरी अचानक झोपेतून उठवावं व दचकून जागं होत बेसावध क्षणी हल्ला करण्याच्या तयारीत अत्यंत क्रुद्धावस्थेतील असेच त्यांचे भासमान आहे.

Advertisement

Advertisement

सिंहाला कधी आपला जबडा मोठा करताना पाहिलय का? तो किती ऐटीत, अत्यंत शांततेत, संयमी अशा अनभिषिक्त सम्राटासारखा आपला जबडा मोठा करतो. त्यातील डौल म्हणजेच त्याच्या स्थैर्य, धैर्य, स्वाभिमान आणि शांततेचीच प्रचिती होय. तो कधीही आक्रस्ताळ्यासारखा भासत नाही. त्याची आयाळ तुम्ही कधी इतक्या विपन्नावस्थेत पाहिली आहे का? सिंहाची आयाळ ही त्याच्या सामर्थ्याचं महत्त्व विशद करणारी, त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी अशीच असते. व आहे. पूर्वीची राजमुद्रा ही अशीच स्थेर्य, धैर्य, शांतता व स्वाभिमान अशा अर्थाची होती व आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

आताच्या सिंहाची आयाळ पहा. कुठेही स्व सामर्थ्याची ग्वाही नाही. आहे ते सगळं उसणं अवसान. आताची राजमुद्रा ही शिल्प कमी आणि गणेशोत्सवात गणपती जसे साच्यातून काढून दहा दिवसाच्या गणपती मूर्ती जशा विक्रीस ठेवतात. अशाच अर्थाची वाटते आहे. अर्थात देश विकणाऱ्या लोकांच्या मनासारखंच सगळं सुरू आहे म्हटल्यावर या नव्या राजमुद्रेबद्दल आपण काय आणखी बोलणार. सरकारला आठ वर्षे होऊन गेली तरीही एकही पत्रकार परिषद न घेणारा देशाचा प्रमुख जसा असुरक्षित आहे. अगदी त्याचच प्रतिबिंब या कालच्या मुद्रेत उमटलं आहे. असं म्हटलं तरी त्यात काही वावगं वाटणार नाही. तब्बल नऊ राज्यातील सरकार इडी अथवा इतर धाकाने कोलमडून पाडणाऱ्या लोकांच्या मनोवृत्तीचं यथासांग वर्णन असणारी ही मुद्राही मला अशीच असुरक्षिततेच्या कारणांचा परिपाक वाटते आहे. या पलीकडे काहीच नाही. ऐतखाऊ लोकांची प्रतिके अशीच असणार. ती अधिक मलूल अशाच अर्थाने प्रकटणार. त्यांचं भाष्य कितीही शूरपणाच्या गोष्टी करणारं असो. ते अधिकच्या माजोरड्या प्रतिमा आणि प्रतिकांच्या पुढे जाऊ शकणार नाही.

Advertisement

Advertisement

सिंह हे जितकं शक्तीचं प्रतिक आहे. तितकचं ते संयमाचं, स्थैर्याचं, धैर्याचही प्रतिक आहे. ना की फक्त क्रोधाचं. अशोकस्तंभावरील सिंह आणि कालच्या स्तंभांवरील सिंह यांच्यात हाच परक दिसतो आहे. बरं अशोकस्तंभ म्हणजे आहे तरी काय? तर सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश ह्यांच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी आरसपानी स्तंभांवर कोरून ठेवलेल्या आहेत, त्यांना ‘अशोकस्तंभ’ म्हणतात. आता प्रजाहित सध्याच्या राजवटीत किती पाहिलं जातय? हे सर्वांना माहीत आहेच. सारनाथ येथील जो अशोकस्तंभ आहे, त्याचे शीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून भारताने पहिल्या प्रजासत्ताक दिनी स्वीकारले. सारनाथ येथेच सर्वप्रथम तथागत बुद्धांनी धम्माबाबतचे आपले विचार मांडले होते. या अर्थाने सारनाथ आणि तेथील अशोक स्तंभाचे महत्त्वही वेगळ्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून पहायला हवे आहे.

Advertisement

Advertisement

काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील के.एस.इश्वरप्पा नावाचा भाजप नेता राष्ट्रीय ध्वज बदलण्याबद्दल बोलला होता. आठवतयं का? यामुळे नवं काही निर्माण करता येत नाही, तर जे समृद्ध असं वारसासंपन्न आहे. त्याची मोडतोड करा. अथवा त्यातील काहीच आपल्या मालकीचं नाही वा आपल्या अमानवी सांस्कृतिक संचितातील नाही. मग त्याची येथेच्छ बदनामी करा. हे सूत्र अगदी इतिहासात घुसडल्या जाणाऱ्या विपर्यासांपर्यंत येऊन ठेपतं. आणि आता या काही नव्या गोष्टी राहिल्या नाहीत. त्यामुळे व्यक्तींची, इतिहासातील महापुरूषांची, स्थळांची, लिहिलेल्या ग्रंथांतील मजकुरांची,भाषांची, स्थानांची, पंथ, संप्रदायांची जी काही विकृत अर्थाने मोडतोड चालू आहे. ती अजून वेगाने होत राहील. आपण सांस्कृतिक निरक्षर आहोत. आणि सांस्कृतिक अर्थाची एकी निर्माण होण्यासाठी संघटित होणं गरजेचं असतं. पहिला स्वातंत्र्यलढा परकीयांविरूद्ध होता. आताचा स्वातंत्र्यलढा हा स्वकीयांविरूद्ध आहे. मग त्यात सर्व प्रकारचे स्वकीय येतील.

Advertisement

(8) Krushirang on Twitter: “Ration Card New Rules: रेशनकार्डचा नवा नियम आला, ताबडतोब सरेंडर करा नाहीतर सरकार वसूल करणार! https://t.co/hTrLfnOjOB” / Twitter

Advertisement
Advertisement

Leave a Reply