Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

CRICKET LIVE : इंग्लंडविरुध्दच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीचं काय होणार ?

Please wait..

CRICKET LIVE : मुंबई : इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने (England Vs India ODI Series) दमदार कामगिरी करत १० विकेट्सने विजय संपादित केला आहे. विजयाची ही घौडधौड दुसऱ्या सामन्यातही कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पहिल्या सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) खेळू शकला नाही, त्यामुळे दुसऱ्या सामन्यातील त्याच्या सहभागाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

टीम इंडियाचा (team India Star Player) स्टार फलंदाज विराट कोहली हा गेल्या काही सामन्यांमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. भारतीय संघासाठी त्याने अनेकदा महत्त्वपूर्ण योगदान दिलं असून आपल्या संघास त्याने एकट्याने एकहाती सामने जिंकुन दिले आहेत. मात्र कोहलीचा खराब फॉर्म सुरु असून फॉर्ममध्ये परत येण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. इंग्लंडविरुध्दचा दुसरा एकदिवसीय सामना उद्या इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार असून त्यातही विराट कोहली खेळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येेते. विराट किरकोळ दुखापतीमुळे त्रस्त असून त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे. विराटने पहिला सामना न खेळताही भारताने सहज सामना जिंकला.

Advertisement

Advertisement

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विराटला विश्रांती देण्यात आली असून विडिंज विरुद्धच पाच टी 20 सामन्यांसाठी अजून संघ निवड झालेली नाही. त्यामुळे इंग्लंड विरुद्धचे दोन टी 20 सामने विराटसाठी महत्त्वाचे होते. पण यामध्ये तो चांगली कामगिरी करु शकला नाही. विराटच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जात असून भारताच्या माजी क्रिकेटपटूंच्या एका गटाने विराटला संघाबाहेर करण्याची मागणी केली आहे, तर त्याचवेळी सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी विराट फॉर्ममध्ये येईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply