Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

CRICKET LIVE : बुमराहने उंचावली भारतीयांची मान; अशी केलीय अफलातून कामगिरी

Please wait..

CRICKET LIVE : मुंबई : बुम बुम बुमराहने (JASPRIT BUMRAH) सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. जसप्रीतन या सामन्यात १९ धावा देत ६ विकेट्स पटकावल्या. या दमदार कामगिरीमुळे बुमराहने एकदिवसीय सामन्यांच्या अव्वल गोलंदाजांच्या तालिकेत (ODI RANKING )तीन स्थानांची झेप घेतली आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंड बोल्ट आणि पाकिस्तानचा शाहिन अफ्रिदी या दोघांना मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे. जसप्रीत बुमराहने ७१८ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले असून त्याने दोन वर्षानंतर पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यात जगातील एक नंबरचा गोलंदाज (NUMBER ONE BOWLER) बनण्याची कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुध्दच्या (ENGLAND ODI)  या सामन्यात बुमराहने एका नवा विक्रम प्रस्थापित केला असून त्याने इंग्लंडच्या संघाविरुध्द कुलदीप यादवचा २५ धावांत ६ बळी घेण्याचा विक्रम मागे टाकला आहे. इतकच नाही तर बुमराहची ही कामगिरी एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली असून ५ विकेट्स घेण्याची ही त्याची दुसरी वेळ ठरली आहे. याचसोबत इंग्लंडमध्ये ६ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, लियाम लिविंगस्टोन, डेविड विली आणि ब्रायडन कार्स या ६ जणांना तंबूत पाठवलं. यातील रॉय, रुट आणि लिविंगस्टोन या तिघांना भोपळाही फोडता आला नाही.

Advertisement

Advertisement

बुमराहच्या या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने इंग्लंडवर १० विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. इंग्लंडचे १११ धांवांचं आव्हान रोहित-धवनच्या जोडीने एकही विकेट न गमावता १८ व्या षटकातच पूर्ण केलं. यामुळे ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने (TEAM INDIA) १-० अशी आघाडी घेतली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply