Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

CRICKET LIVE : बुमराहचा भेदक मारा, रोहित-धवनची दमदार फलंदाजी : भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

cricket live : मुंबई : इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (England Vs India Cricket Series) भारतीय संघाने १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आहे. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली असून बुमराहने १९ धावा देत ६ विकेट्स पटकावल्या. यामुळे इंग्लंडचा डाव २५ षटकात ११० धावांवर आटोपला.

Advertisement

Krushirang on Twitter: “Men Health Tips: पुरुषांनी ‘या’ टिप्स करा फॉलो; दीर्घकाळ राहणार निरोगी आणि तरुण https://t.co/B95yuC7poh” / Twitter

Advertisement

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आज इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. पहिल्या स्पेलमध्ये ४ तर दुसऱ्या स्पेलमध्ये २ विकेट्स घेत बुमराहने सामन्यावर भारताला एकहाती वर्चस्व प्रस्थापित करु दिले. त्यानंतर मोहम्मद शमीने (Mohammad Shami) तीन विकेट्स मिळवून देत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. भारतीय संघाने १११ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. रोहित शर्मा (Rohit Sharma) व शिखर धवन (Shikhar Dhavan) यांनी दमदार फलंदाजी करत तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

Loading...
Advertisement

Krushirang on Twitter: “Cricket Live: बुम.. बुम.. बुमराह जोमात..! पहा काय कारनामा केलाय त्याने इंग्लंडमध्ये https://t.co/TIKm9pY9WZ” / Twitter

Advertisement

रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच क्लास घेतला. हिटमॅन रोहितने तीन उत्तुंग षटकार मारत वन डेतील ४५ वे अर्धशतक पूर्ण केले. रोहितने ५८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७६ धावा केल्या, तर धवनने ३१ धावा करत रोहितला चांगली साथ दिली. गोलंदाज आणि फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताला १० विकेट्स व १८८ चेंडू राखून विजय मिळवता आला. चेंडूंच्या बाबतीत भारताचा हा तिसरा मोठा विजय ठरला असून यापूर्वी भारताने केनियाविरुद्ध २३१ चेंडू व वेस्ट इंडिजविरुद्ध २११ चेंडू राखून विजय मिळवला होता. दरम्यान, विजयाचा शिल्पकार ठरलेल्या बुमराहने ६ विकेट्स घेत इंग्लंडमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवचा (६-२५) विक्रम मोडला आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील मोठी बातमी.. ‘या’ दिवशी देशाला मिळणार नवीन राष्ट्रपती; जाणून घ्या, महत्वाचे Update https://t.co/zf8WWPBH1f” / Twitter

Advertisement
Advertisement

Leave a Reply