Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Cricket Live: बुम.. बुम.. बुमराह जोमात..! पहा काय कारनामा केलाय त्याने इंग्लंडमध्ये

Please wait..
Cricket Live news : मुंबई: इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (England vs India cricket series) जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंड फलंदाजांच्या नाकात दम आणला असून बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची अक्षरश: दाणादाण उडाली. जसप्रीतने पहिल्या ५ षटकांत ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या, यामध्ये दोन षटकं निर्धाव होती.

Advertisement
वन डे वर्ल्ड कप चॅम्पियन (one day world champion) असणाऱ्या इंग्लंडच्या संघाची अवस्था भारतीय गोलंदाजांनी (Indian bolling) अत्यंत दयनीय केली असून पहिल्या स्पेलमध्ये बुमराहने चार विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या स्पेलमध्ये दोन विकेट घेत त्याने वन डे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा एका सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. इंग्लंडच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर जेसन रॉयला (jesson roy) दुसऱ्या षटकात बुमराहने माघारी पाठवले. पाच चेंडू खेळून एकही धाव न करता रॉय आऊट झाला. रॉयनंतर एक चेंडूच्या अंतराने बुमराहने इंग्लंडला मोठा धक्का देत जो रूटला बाद केले. बुमराहच्या या षटकानंतर शमी गोलंदाजीसाठी (mohammad shami) आला. त्याने बेन स्टोक्सला शून्यावर आऊट करत इंग्लंडची अवस्था ३ बाद ७ अशी केली. त्यानंतर जॉनी बेअरस्टो, लिएम लिव्हिंगस्टोन यांच्या विकेट घेत इंग्लंडच्या संघाला गळतीच लागली. इंग्लंडच्या निम्मा संघ २७ धावांवर तंबूत परतला.

Advertisement
सुरुवातीच्या झटक्यानंतर मोईन अली आणि जोस बटलर यांनी सावध खेळ करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसिद्ध कृष्णाने स्वत:च्याच बॉलिंगवर अलीचा कॅच टिपला आणि इंग्लंडला ५३ धावांवर ६ वा धक्का बसला. त्यानंतर मोठे शॉट खेळण्याच्या नादात बटलरही बाद झाला. बटलरनंतर शमीने (buttler out) पुढच्याच षटकात क्रेग ओव्हरटनचा दांडा उडवून वन डेतील १५० वी विकेट घेतली आणि भारताकडून सर्वात जलद १५० विकेट्स घेण्याचा विक्रम शमीने नावावर केला. इंग्लंडचा डाव ११० धावांवर आटोपला. बुमराहने १९ धावांत ६ विकेट्स घेतल्या तर शमीने ३ विकेट्स घेतल्या.

Advertisement
Advertisement

Leave a Reply