Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Rain Alert : बाब्बो.. ‘या’ राज्यांत पावसाचे थैमान.. पहा, निसर्गाने कसा दिलाय फटका..

Please wait..

Rain Alert : गुजरात (Gujarat) आणि मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) पावसाशी संबंधित घटनांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पश्चिम आणि मध्य भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. महाराष्ट्रातील गडचिरोली (Gadchiroli) आणि नाशिक (Nasik) जिल्ह्यात मुसळधार आणि संततधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने तीन जण बेपत्ता झाले आहेत, तर गोदावरी नदीच्या काठावर असलेली अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

Advertisement

Advertisement

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत तीन जण वाहून गेले होते आणि नंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अजून तीन जण नाल्यात वाहून गेल्यानंतरही बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई (Mumbai) आणि लगतच्या भागात सोमवारीही हलका पाऊस झाला. एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधीनंतर सोमवारी दुपारी दिल्लीच्या काही भागात पाऊस पडला.

Advertisement

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजस्थानमध्ये (Rajasthan) बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे, तर सोमवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. दक्षिण आणि मध्य गुजरातमधील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे किमान सात जणांचा मृत्यू झाला. पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, तर 9,000 हून अधिक लोकांना हलवण्यात आले आणि 468 लोकांना वाचविण्यात आले. दक्षिण गुजरातमध्ये डांग, नवसारी, तापी आणि वलसाड जिल्हे प्रभावित झाले आहेत, तर मध्य गुजरातमध्ये पंचमहाल, छोटा उदयपूर आणि खेडा हे पावसाने प्रभावित आहेत.

Advertisement

Advertisement
Loading...

हवामान खात्याने येत्या पाच दिवसांत डांग, नवसारी, वलसाड, तापी आणि सुरतमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री राजेंद्र त्रिवेदी म्हणाले, की ‘गेल्या 24 तासात पावसाशी संबंधित घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे, 1 जूनपासून आतापर्यंत गुजरातमध्ये वीज पडणे, बुडणे, भिंत कोसळणे अशा पावसाशी संबंधित घटनांमध्ये 63 जणांचा मृत्यू झाला आहे.’

Advertisement

हवामान खात्याने मध्य प्रदेशातील 52 पैकी 33 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert In Madhya Pradesh) जारी केला आहे, तर संततधार पावसामुळे गेल्या 24 तासांत विजेच्या धक्क्याने सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी दुपारी 2.30 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला असून, 1 जूनपासून राज्यभरात अशा घटनांतील मृतांची संख्या 60 झाली आहे, असे महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

IMD ने नाशिक जिल्ह्यासाठी 14 जुलैपर्यंत ‘रेड’ अलर्ट  (Red Alert In Nasik) जारी केला असून, 24 तासांत 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, सोमवारी एका अधिकृत वृत्तात म्हटले आहे की आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) नुसार, दिवसभरात बुडून कोणीही मरण पावले नाही, या वर्षी पूर आणि जमीन खचल्यामुळे मृतांची संख्या 192 वर पोहोचली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply