Heavy Rain : सावधान..! ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा.. प्रशासनाने नागरिकांनाही केले अलर्ट; जाणून घ्या..
Heavy Rain : भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात 11 ते 14 जूलै या कालावधीत अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी (Godavari) नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून आता 72 हजार 717 क्यूसेक व भिमा (Bhima) नदीस दौंड पूल येथे 30 हजार 523 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा (Heavy Rain Alert In Ahmednagar) देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत 166.3 मि.मी. (37.1 %) पाऊस (Rain) पडला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाद्वारे सोडलेल्या विसर्गामुळे नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 72 हजार 717 क्युसेक तसेच भिमा नदीस पुणे जिल्ह्यात झालेल्या पर्जन्यमानामुळे दौंड पूल येथे 30 हजार 523 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या (Dam) पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल पार करू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जुनाट / मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे जमीन खचण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्याऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
Weather Updates : राज्यात जोरदार बरसणार; हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्यांना दिलाय Alert; जाणून घ्या.. https://t.co/4WxFDCfSB2
Advertisement— Krushirang (@krushirang) July 7, 2022
Advertisement
घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवितास धोका उद्भभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfi) काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
IMD: ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस; IMD ने दिला मोठा इशारा https://t.co/Fg4JlLN0cf
Advertisement— Krushirang (@krushirang) July 5, 2022
Advertisement