Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : काळजी घ्या.. कोरोनाने पुन्हा घेतला वेग.. ‘या’ जिल्ह्यात सापडले इतके नवे रुग्ण..

Please wait..

Corona Update – करोना हा घातक साथरोग अजूनही संपलेला नाही. मागील काही दिवसांपासून तर या आजाराने पुन्हा वेग घेतला आहे. देशभरात करोनाचे रुग्ण (Corona Patients) वेगाने वाढत आहेत. नगर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. रविवारी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या एकाच दिवसात तब्बल 76 नवीन रुग्ण सापडले आहेत. नगर जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आला असताना काही दिवसांपासून रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने आरोग्य विभागाचे (Health Department) टेन्शन वाढले आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. राज्यातही अनेक ठिकाणी रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. नगरमध्ये आधी रुग्णसंख्या दहाच्या आत होती. मात्र काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या संख्येत वेगाने (Corona Patients Increase In Ahmednagar District) वाढ होत आहे. यामध्ये नगर शहरात सर्वाधिक म्हणजे 21 रुग्ण सापडले आहेत. तसेच जामखेड 1, कर्जत 3, कोपरगाव 2, नगर तालुका 8, पारनेर 4, पाथर्डी 5, राहाता 4, राहुरी 2, संगमनेर 1, शेवगाव 5, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 6, कँटोन्मेंट बोर्ड 8, मिल्ट्री हॉस्पिटल 3 आणि बाहेरच्या जिल्ह्यातील 1 असे एकूण 76 रुग्ण सापडले आहेत. तर दुसरीकडे रविवारी एकूण 28 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

Advertisement

Advertisement

विशेष म्हणजे, मंगळवारनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा पन्नासच्या पुढे गेली आहे. त्यामुळे करोनाचा धोका आणखी वाढला आहे. तर दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरण्यासह अन्य महत्वाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडूनही तसे आवाहन नागरिकांना सातत्याने केले जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply