Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Dengue : पावसाळ्यात ‘या’उपायांद्वारे रोखा Dengue.. वाचा तुमच्यासाठी महत्वाची माहिती..

Please wait..

Dengue : पावसाळा म्हटला की साथीचे आजार पसरण्याची शक्यता असतेच. जलजन्य आणि किटकजन्य आजार पसरण्याची भीती असते. मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue), चिकुनगुण्या यांसारखे घातक आजार याच काळात पसरतात. त्यामुळे या आजारांचे नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून पावसाळा सुरू होण्याआधीच प्रयत्न सुरू केले जातात. करोना या साथरोगाच्या दोन वर्षांनंतरही डेंग्यू या घातक आजाराला रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मागील चार महिन्यांच्या काळात नाशिक विभागात डेेंग्यूचे फक्त 45 रुग्ण (Dengue Patients) सापडले आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यात फक्त 4 रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

Advertisement

उन्हाळ्यातील जास्त तापमानात डास कमी असले तरी पावसाळ्यात मात्र डासांची (Mosquito) संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे या दिवसांत डासांपासून उद्भवणार्‍या आजारांची संख्याही जास्त असते. डेंग्यू, चिकुणगुण्याचे रुग्ण आढळतात. त्यामुळे या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येतात. विभागाने मागील सहा वर्षांच्या काळात राब

Advertisement

विलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत. या सहा वर्षांच्या काळात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, आजार आटोक्यात आला असला तरी धोका कायम आहे. त्यात आता पावसाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहेच.

Advertisement

डेंग्यूची लक्षणे
या आजारात रुग्णाला अचानक ताप येतो, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, तीव्र डोळेदुखी तसेच अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, अंगावर पुरळ येणे अशी काही लक्षणे दिसतात. त्यासोबत त्वचेखाली रक्तस्त्राव, रक्ताची उलटी होणे, पोट दुखणे अशीही लक्षणे दिसतात.

Advertisement

Advertisement
Loading...

उपाययोजना
डेंग्यू आजार नियंत्रणात आणण्यासाठी डासांवर नियंत्रण मिळवले पाहिजे. तसेच डेंग्यू बाधित रुग्णास तत्काळ योग्य औषधोपचार मिळाले पाहिजेत.

Advertisement

डास नियंत्रणासाठी..
डेंग्यू पसरवणारे डास साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात.
पाण्याच्या टाक्यात डासांची पैदास होऊ नये यासाठी त्यास घट्ट झाकण बसवावे.
घरातील पाण्याचे भांडे आठवड्यातून एक दिवस रिकामी व स्वच्छ करून पुन्हा भरणे. भांडे व्यवस्थित झाकून ठेवणे अत्यंत महत्वाचे.
इमारतीच्या छतावर आणि परिसरात पाणी साठू देऊ नये.
परिसरातील घराजवळील पाण्याची डबकी वेळीच काढून टाकावी किंवा येथील पाणी वाहते करावे.
डेंग्यूसाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गावांमध्ये किटकनाशकांची धूर फवारणी करावी.

Advertisement

रुग्णसंख्या होतेय कमी..

Advertisement

सन 2016 मध्ये नाशिक विभागात एकूण 5908 नमुने तपासण्यात आले त्यापैकी 1957 डेंग्यू बाधित रुग्ण आढळले होते. या रुग्णांची टक्केवारी 33.12 इतकी होती. त्यानंतर 2017 मध्ये 3637 पैकी 1461 रुग्ण (40.17 टक्के) आढळले होते. 2018 मध्ये 5961 पैकी 1650 रुग्ण (27.67 टक्के) आढळले होते. 2019 मध्ये 10450 पैकी 2511 रुग्ण (24.02 टक्के) आढळले होते. 2020 मध्ये 3081 पैकी 614 रुग्ण (19.92 टक्के) आढळले होते. 2021 मध्ये 12692 पैकी 1997 रुग्ण (15.73 टक्के) आढळले होते. त्यानंतर चालू 2022 मध्ये एप्रिल महिन्यापर्यंत 452 रक्तजल नमुने तपासणी केली असून त्यापैकी 45 बाधित रुग्ण (9.95 टक्के) आढळले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply