Government Bank: सार्वजनिक क्षेत्रातील (Government) आणखी एका बँकेने (Bank) वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जावरील व्याजदरात (interest rate) वाढ करून ग्राहकांना (Coustom) मोठा धक्का दिला आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) केलेला हा बदल 10 जुलैपासून लागू झाला आहे. बँकेने विविध मुदतीच्या कर्जावरील निधी आधारित व्याज दरात (MCLR) 0.10 टक्के वाढ केली आहे.
10 जुलैपासून नवीन दर लागू
IOB ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की MCLR मध्ये 10 जुलै 2022 पासून सुधारणा करण्यात आली आहे. बँकेचे नवे दर उद्यापासून म्हणजेच 10 जुलैपासून लागू होतील. या बदलानंतर MCLR आधारित व्याजदर 6.95 टक्क्यांवरून 7.55 टक्के होईल. एक वर्षासाठी MCLR 7.55 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो 7.45 टक्के होता.
MCLR 6.95-7.50 टक्के वाढवला
वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज MCLR शी जोडलेले आहेत. बँकेने दोन आणि तीन वर्षांच्या कर्जासाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवून 7.55 टक्के केला आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने एक दिवस ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 0.10 टक्क्यांनी 6.95-7.50 टक्क्यांनी वाढवला आहे.
Share market: शेअर बाजारात खळबळ, सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा घसरला; जाणुन घ्या लेटेस्ट अपडेट https://t.co/UGTJiabHUg
Advertisement— Krushirang (@krushirang) July 11, 2022
Advertisement
RLLR दरही वाढला
इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने देखील 10 जुलैपासून रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, 10 जुलैपासून हा दर 7.75 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
Berojgari Bhatta: तरुणांनो…! सरकार देत आहे दरमहा 1500 रुपये; फक्त करा ‘हे’ काम https://t.co/cpI8gRcrQq
Advertisement— Krushirang (@krushirang) July 11, 2022
Advertisement
IOB पूर्वी, कॅनरा बँकेने निधी आधारित व्याज दर (MCLR) 0.10 टक्क्यांनी वाढवलेला आहे. याशिवाय बँक ऑफ बडोदा 0.1 ते 0.2 टक्क्यांनी, एचडीएफसी बँकेत 0.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरबीआयने मे आणि जूनमध्ये रेपो दरात 90 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यानंतर बँकांनीही व्याजदरात वाढ केली आहे.