Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Organic Farming : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सेंद्रीय शेतीसाठी कृषी विभागाने घेतला ‘हा’ निर्णय..

Please wait..

Organic Farming – रासायनिक खतांच्या अतिवापराने शेत जमिनींचे आरोग्य बिघडत चालले आहे. यामुळे मानवी आरोग्य (Human Health) आणि पर्यावरणासही (Environment) धोका निर्माण झाला आहे. जमिनीतील आवश्यक अन्नद्रव्य व मूलद्रव्यांचे संतुलन बिघडले आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी सेंद्रीय शेतीचा (Organic Farming) पर्याय समोर आला आहे. नगर जिल्ह्यात सेंद्रीय शेती अभियान राबविण्यात येत आहे. यंदाही अभियान राबविण्यात येणार असून जवळपास 15 शेतकरी निवडण्यात येणार आहेत. यासाठी आत्मा विभागाने जिल्ह्यातील सेंद्रीय शेती गटांकडून प्रस्ताव मागविले आहेत. विशेष म्हणजे, यंदा या गटांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Producer Company) स्थापन करण्यात येणार आहेत.

Advertisement

Advertisement

काही वर्षांपासून रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रासायनिक खतांचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून पर्यावरणपूरक शेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. जिल्ह्यात कृषी विभागामार्फत परंपरागत कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी गटांची नियुक्ती करण्यात येत आहे. याआधी काही गट स्थापन करण्यात आले होते. तीन वर्षांनंतर या गटांचे प्रमाणीकरण करून त्यांची नोंंदणी (Registration) करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. 2016-17, 2017-18 आणि 2018-19 या वर्षात 36 गट निवडण्यात आले. यामध्ये एकूण 1584 शेतकर्‍यांचा सहभाग होता. त्यानंतर 2019-20 मध्ये 17 गट निवडण्यात आले. यामध्ये 571 शेतकर्‍यांचा समावेश होता. त्यानंतर आता या वर्षात 15 गट नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी आत्माने प्रस्ताव मागविले आहेत. या प्रत्येक गटाला प्रत्येकी 20 हेक्टर क्षेत्र निश्‍चित करण्यात येईल.

Advertisement

Advertisement
Loading...

नवीन आयडीया

Advertisement

यावेळी कृषी विभागाने एक नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सेंद्रीय शेती गटांचे एफपीओ (FPO) मध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. कंपनी कायद्यांतर्गत कंपनी नोंदणी करण्यात येणार आहे. यावेळी प्रथमच अशा पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply