Employment – नगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या (Employment Guarantee Scheme) माध्यमातू लोकांना रोजगार उपलब्ध होत असला तरी सध्या रोजगार हमीच्या कामांवर मजुरांची (Worker) कमतरता जाणवत आहे. पावसाळ्यात (Rain Season) जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या वेगाने होत आहेत. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांवर मजूर संख्या कमी होत आहे. जिल्ह्यात सध्या 1401 कामे सुरू असून या कामांवर 6 हजार 942 मजूर काम करत आहेत.
जिल्ह्यात ठिकठिकाणी रोजगार हमी योजनेतील कामे सुरू आहेत. यामध्ये वृक्षारोपण, घरकुल बांधकाम (House Construction), रस्त्यांचे बांधकाम (Road Construction) अशी कामे सुरू आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना निश्चित रोजगार उपलब्ध होत आहे. मागील महिन्यात मजुरांची संख्या जास्त होती. कामांची संख्या सुद्धा जास्त होती. जुलै महिन्यात मात्र या दोन्हीतही घट झाल्याचे दिसत आहे.
PM Narendra Modi: विनाधूर स्वयंपाकालाही बसलाय झटका; पहा काय केले मोदी सरकारने https://t.co/YW4T4Wt7oS
Advertisement— Krushirang (@krushirang) July 9, 2022
Advertisement
जिल्ह्यातील कामांची स्थिती (कंसात मजूर संख्या)
अकोले 125 (401), जामखेड 179 (1091), कर्जत 130 (626), कोपरगाव 99 (286), नगर 81 (353), नेवासा 119 (711), पारनेर 46 (460), पाथर्डी 110 (536), राहाता 52 (194), राहुरी 85 (290), संगमनेर 98 (456), शेवगाव 131 (801), श्रीगोंदा 123 (631), श्रीरामपूर 23 (106)
PM Kisan: शेतकऱ्यांना धक्का; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; जाणुन घ्या प्रकरण https://t.co/XSbIVeIRok
Advertisement— Krushirang (@krushirang) July 11, 2022
Advertisement
पगार कमी, मजूर वाढणार तरी कसे ?
केंद्र सरकारने (Central Government) रोजगार हमी योजनेच्या मजुरीत (Wages Increase) वाढ केली आहे. ही पगारवाढ करताना सध्याच्या वाढलेल्या महागाईचा कोणताही विचार सरकारने केलेला नाही. मजुरीत फक्त 8 रुपये वाढ केली आहे. मजुरांना आता दर दिवशी 256 रुपये इतकी मजुरी मिळत आहे. याआधी 248 रुपये मिळत होते.
रोजगारासाठी मेगा प्लान..! शंभर दिवसात ‘इतक्या’ बेरोगारांना मिळणार रोजगार; पहा, कुणी घेतलाय निर्णय..