Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Petrol Price Hike news: भारीच की.. मग पेट्रोलला कायमचाच रामराम..! गडकारींनी म्हटलेय असे..

Please wait..

Petrol Price Hike news: नागपूर : सध्या केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या कृपेने पेट्रोल आणि डिझेल यावरील कर जाम वाढलेले आहेत. अशावेळी सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना मंत्री नितीन गडकरी ही दिलासा देणारे स्टेटमेंट देऊन मस्त चर्चेत आहेत. आताही त्यांनी थेट पेट्रोल हे इंधन बाद किंवा त्यावरील अवलंबित्व कमी करण्याची घोषणा देऊन टाकली आहे. त्याचीही आता सोशल मिडियामध्ये जोरदार चर्चा आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

पाच वर्षांनंतर देशातील (Nitin Gadkari has expressed confidence of using green fuel in all vehicles) सर्व वाहनांमध्ये हिरवे इंधन वापरण्याचा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. येत्या काही वर्षांत वाहनांमधील पेट्रोलची उपयुक्तता पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. गडकरी यांनी गुरुवारी, ७ जुलै रोजी अकोला, महाराष्ट्र (Akola, Maharashtra) येथे दिलेल्या निवेदनात हे सांगितले आहे. अकोल्यातीलच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे केंद्रीय मंत्र्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

Advertisement

Advertisement

येथील भाषणादरम्यान त्यांनी ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि इतर हरित इंधनाच्या वापरावर भर दिला. (honorary degree of Doctor of Science by Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth in Akola) “मला खात्री आहे की पाच वर्षांनंतर देशात पेट्रोल वापर संपेल. तुमच्या कार आणि स्कूटर (cars and scooters) पूर्णपणे ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी किंवा एलएनजीवर (green hydrogen, ethanol, CNG or LNG) आधारित असे ते म्हणाले. येत्या पाच वर्षांत कृषी विकास दर १२ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहनही गडकरींनी कृषी संशोधक (agricultural researchers and experts to work towards increasing the agricultural growth rate) आणि तज्ज्ञांना केले.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply